*देगलूर शहरातील डाक कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण* देगलूर – प्रतिनिधी ” आज देगलूर येथील डाक कार्यालय परिसर येथे साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आले.
या अभियानात देगलूर उपविभागाचे डाक निरीक्षक बी ए मुंडे, पोस्ट मास्तर विनोद दासरवाड, पोस्टल असिस्टंट श्रीकांत उमाटे, पोस्टल असिस्टंट सोळंके, मेलवरसर हनुमंत जामनेर, शरीफ आतार, पोस्टमन बालाजी जाजनुरे, पोलीस उपनिरीक्षक फड साहेब, माजी उपनगराध्यक्ष अविनाश नीलमवार, भाजप शहराध्यक्ष प्रशांत दासरवाड,राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी , माजी सरपंच सुरेश मिसाळे, उमाकांत मुंडकर, यांच्यासह अनेक डाक कर्मचाऱ्यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग होता. यावेळी सर्व मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला.