Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आमदार शहाजीबापू पाटलांनी जाणून घेतल्या तालुक्यातील जनतेच्या अडचणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 15, 2024
in top news
0
आमदार शहाजीबापू पाटलांनी जाणून घेतल्या तालुक्यातील जनतेच्या अडचणी
0
SHARES
472
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार शहाजीबापू पाटलांनी जाणून घेतल्या तालुक्यातील जनतेच्या अडचणी

शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे दिले आदेश

सांगोला (तालुका प्रतिनिधी): गुडघेदुखीच्या आजारातून बरे झाल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी संपर्क कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर संपर्क कार्यालयात उपस्थित राहिल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी तात्काळ सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सर्व योजनांची सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेत अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

गुडघेदुखीचा त्रास असतानाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी माढा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेत पायाला भिंगरी बांधून प्रचार यंत्रणा राबविली. मात्र, या प्रचाराच्या धावपळीत गुडघेदुखीचा आजार बळवल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार झाले. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जावून आमदार शहाजीबापूंच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयात आमदार शहाजीबापूंची भेट घेवून तब्येतीची विचारपूस केली होती.

आजारातून बरे झाल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी चिकमहूद गावी आले. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याने आजारी असतानाही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी विधीमंडळात दाखल झाले. यावरून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या तब्येतीबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

तब्येत ठणठणीत झाल्याने सोमवार १५ जुलै रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी संपर्क कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. आ.शहाजीबापूंनी जनसंपर्क कार्यालयांमध्ये उपस्थित राहून तालुक्यातील जनतेशी संवाद साधला. तालुक्यातील मुख्य प्रश्न जाणून घेऊन त्या समस्या निराकरण करण्यासाठी प्रशासनाला तातडीने आदेश दिले. यावेळी उपस्थित नागरिकांनी देखील आमदार शहाजी बापूंच्या तब्येतीची विचारपूस करून शरीराची काळजी घेण्याची विनंती केली.

यावेळी आमदार शहाजीबापूंनी पीक विमा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, नवमतदार नोंदणी अभियान, दुष्काळ निधीचे वाटप, खरीप हंगामातील पेरण्या, प्रगतीपथावर असलेली विकास कामे , पाणीपुरवठा, जनजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असलेली कामे, शासकीय विश्रामगृह व प्रशासकीय भवनचे सुरू असलेले काम, याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत शासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

Post Views: 8
Previous Post

भोकरदन शहरातला कचरा घाण एक ऑगस्ट पर्यंत हटवा! अन्यथा सरकारी कार्यालयामध्ये आजी माजी लोकप्रतिनिधीच्या घरासमोर कचरा टाकला जाईल -कडुबा बोरशे

Next Post

श्रीसंत मुक्ताबाईंच्या नावाने मंगेश महाराजांच्या शुभहस्ते वृक्षारोपण.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
श्रीसंत मुक्ताबाईंच्या नावाने मंगेश महाराजांच्या शुभहस्ते वृक्षारोपण.

श्रीसंत मुक्ताबाईंच्या नावाने मंगेश महाराजांच्या शुभहस्ते वृक्षारोपण.

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680181

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697