Thursday, September 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर*

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 22, 2024
in top news
0
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर*
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर*

*एकही पात्र महिला वंचित राहणार नाही यासाठी लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी – आमदार लोणीकरांची महिला मेळाव्यादरम्यान उपस्थितांना सूचना*

*मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता मंठा तालुक्यातील हजारो महिलांची मेळाव्याला प्रत्यक्ष उपस्थिती*

*मेळाव्या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने ३५१८ तर ऑफलाइन पद्धतीने ६८५९ असे एकूण १०३७७ फॉर्म झाले जमा- आमदार लोणीकर यांची माहिती*

*शासकीय यंत्रणेतील अंगणवाडी कार्यकर्ता यांच्यासह अधिकारी – कर्मचारी यंत्रणा अर्ज भरून घेण्यासाठी सज्ज, ग्रामपंचायत कार्यालयातील संगणकावर तथा नारीशक्ती दूत ॲपवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म भरा; फॉर्म भरण्यासाठी ३१ ऑगस्ट अंतिम तारीख – आमदार लोणीकर*

*लाभार्थी महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक; योजनेच्या मुदतवाढीसह कागदपत्रांमधील अडचणी दूर करण्यासाठी सरकारला विनंती केली – लोणीकर*

*तालुक्यातील अधिकाधिक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासकीय यंत्रणेसह सर्वांनी पुढाकार घ्यावा – आमदार लोणीकर*

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, मुलींचे मोफत उच्च शिक्षण, शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना, पिंक रिक्षा योजना, आई योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला स्टार्ट योजना यासह विविध योजनांवर भर देत महिलांना सक्षम होण्यासाठी या योजनांचा लाभ घ्यावा – आमदार लोणीकरांचे उपस्थितांना आवाहन*
===============================
प्रतिनिधी
मंठा तालुक्यातील प्रत्येक पात्र महिला लाभार्थीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ मिळावा यासाठी आपण स्वतः सर्वतोपरी प्रयत्न करणार असून तालुक्यातील एकही महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता २२ जुलै २०२४ रोजी गणेश मंगल कार्यालय मंठा येथे सकाळी ११ वाजता भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते महिला भगिनींनी फॉर्म भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आजच्या या मेळाव्या दरम्यान ३५१८ महिलांचे ऑनलाईन तर ६८५९ महिलांचे ऑफलाइन पद्धतीने असे एकूण १०,३७७ अर्ज भरून घेण्यात आले अशी माहिती आमदार लोणीकर यांनी यावेळी दिली. प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.

गणेश मंगल कार्यालय मंठा येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या महिला मेळाव्यासाठी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर तहसीलदार सोनाली जोंधळे महिला बालकल्याण अधिकारी श्रीमती कोमल कोरे गटशिक्षणाधिकारी श्री सोळंके नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री धीरज भांबरे गटविकास अधिकारी गगन बोने, गणेश राव खवणे भाऊसाहेब गोरे भाजपा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ संदीप गोरे राजेश मोरे कैलास बोराडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विलास घोडके नागेशराव घारे दत्ता कांगणे,यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की, प्रत्येक लाभार्थी महिलेने आपले आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक खात्याचे पासबुक, पॅन कार्ड, केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड, पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्र स्वतः उपस्थित राहून ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचे आहेत. तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा हे ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहेत. संपूर्ण तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अमलबजावणी साठी यापूर्वी प्रशिक्षण व आढावा बैठक घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेता व तालुक्यातील अर्ध्या अधिक महिला पंढरपूरला पायी दिंडीमध्ये गेलेल्या असल्यामुळे त्या वंचित राहू नयेत यासाठी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या योजनेसाठी मुदतवाढ मागितलेली होती त्यानुसार मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सदरील विनंती मान्य करत या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात यावा अशी मागणी देखील आपण शासनाकडे केली होती त्यावर शासनाने सकारात्मक विचार करून मागणी मान्य केली असल्याचे देखील यावेळी श्री लोणीकर यांनी स्पष्ट केले

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६५ वर्षे वयोगटातील आवश्यक असून त्यांना प्रति महिना १५०० रुपये लाभ दिला जाणार आहे त्यासाठी संबंधित महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक असून विवाहित विधवा घटस्फोटीत परिचकता किंवा निराधार महिलांचा यामध्ये समावेश केला जाईल एका कुटुंबातील दोन लाभार्थी महिलांचा यामध्ये समावेश केला जाणारा असून लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे तसेच ज्यांच्याकडे वार्षिक उत्पन्न दाखला नसेल अशा महिलांनी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडणे आवश्यक असून नारी शक्ती दूत या अधिकृत मोबाईल ॲप वर देखील फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे दरवर्षी या योजनेसाठी सुमारे ४६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी श्री लोणीकर यांनी उपस्थितांना दिली

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी ०५ एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.२.५० लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार लोणीकर यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील सुरू करण्यात आली असून राज्यातील ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना वर्षभरात ०३ गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी लोणीकरांनी दिली. त्याचबरोबर मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात आला असून या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंग वास्तुशास्त्र फार्मसी वैद्यकीय शिक्षण तसेच कृषी व्यवसाय विषयक व्यावसायिक पदवी व पदवी का अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली जाणार असल्याचे यावेळी लोणीकर म्हणाले.

लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, मुलगी पहिल्या वर्गात गेल्यानंतर ६ हजार रुपये, मुलगी सहावीच्या वर्गात गेल्यावर ७ हजार रुपये, मुलगी अकरावीच्या वर्गात गेल्यावर ८ हजार रुपये तर १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये असे एकूण ०१ लाख ०१ हजार रुपये इतका लाभ मुलींना मिळणार आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून ५ वी ते १० वीच्या मुलींसाठी ६०० रुपये ते ३००० रुपये पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती दिली मंजूर शिष्यवृत्ती थेट विद्यार्थीनीच्या खात्यात जमा होणार असून त्यासाठी विद्यार्थिनींच्या पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र व मुलीची शाळेतील ७५ टक्के पेक्षा अधिक उपस्थिती आवश्यक असल्याची माहिती यावेळी लोणीकरांनी दिली

राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर विरोधकांनी सदरील योजना टिकणार नाही अशा शब्दात अवहेलना करत या योजनेची खिल्ली उडवली होती परंतु प्रत्यक्षात मात्र या योजनेसाठी आपल्याला श्रेय मिळावी म्हणून मतदारसंघात मोठमोठे फ्लेक्स लावले आहेत या योजनेसोबतच लाडक्या भावांसाठी काय असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता जनसामान्यांमध्ये देखील याबाबत मागणी असल्याचे दिसून आले

त्यानुसार पंढरपूर यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना जाहीर केली असून बारावी उत्तीर्ण तरुणाला ०६ हजार रुपये, आयटीआय किंवा पदविका धारक तरुणाला ०८ हजार रुपये तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक तरुणाला १० हजार रुपये दिले जाणार असल्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली. यासाठी १८ ते ३५ अशी वयाची अट असून संबंधित लाभार्थी तरुण हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अपेक्षित आहे उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा त्याचबरोबर उमेदवाराचा बँक खाते क्रमांक हा आधार कार्डशी लिंक केलेला असणे बंधनकारक आहे. असेही यावेळी लोणीकर यांनी बोलताना स्पष्ट केले.

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.आस्थापना/उद्योग/महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना/उद्योग / महामंडळ या मध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल.

या योजनेंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल/अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. सदर कार्य प्रशिक्षणचा कालावधी ६ महिने असून सदरच्या ६ महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल.तसेच या योजनेच्या प्रशिक्षणा नंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार सबंधित उद्योग/ आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. असेही यावेळी लोणीकरांनी स्पष्ट केले

पुढे श्री लोणीकर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना देण्यात येणारी १० हजार रुपयांच्या अनुदाना ऐवजी अनुदानाची रक्कम आता २५ हजार रुपये करण्यात आले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तनांचा कॅन्सर व गर्भाशयाचा कॅन्सर तपासणी उपकरणे व साहित्यासाठी ७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात अली आहे.

रुग्णांची विशेषता गरोदर माता व बालकांचे हॉस्पिटलमध्ये न्यान करण्यासाठी ३३२४ रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने राज्यातील १९ शहरांमध्ये पिंक रिक्षा योजना लागू करण्यात आली असून महिलांना पर्यावरण पूरक अशा रिक्षा सरकारी अनुदानातून मिळणार आहेत

त्यामध्ये राज्य शासनाकडून २०% अनुदान दिले जाणार असून ७०% कर्ज पुरवठा बँकांमार्फत केला जाणार आहे केवळ १०% टक्के खर्च लाभार्थी महिलांना करावा लागणार आहे या कर्जाची परतफेड ०५ वर्षासाठी असून १८ ते ३५ वर्षे वयोगटाच्या महिला यासाठी अर्ज करू शकतात. पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना सक्षम बनता यावे यासाठी आई योजना अंतर्गत १५ लाखापर्यंतचा कर्जावरील व्याजाचा परतावा करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आहे त्याचबरोबर महिला लघुउद्योगजकांसाठी शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती यावेळी श्री लोणीकर यांनी दिली.

यावेळी विठ्ठलराव काळे, प्रसाद बोराडे प्रसाद गडदे मोहनराव आडे कैलास चव्हाण राजेभाऊ खराबे,महादेव बाहेकर नगरसेविका यमुनाताई दवणे, बाबाजी जाधव दौलत शहाने आनंद जाधव प्रसाद बोराडे , अमोल मोरे प्रकाशराव मुळे शरद पाटील नितीन सरकटे किशोर हनवते अरुण खराबे मनोज देशमुख सुरेश बाहेकर नरेंद्र ताठे दिगंबर आवचार भगवान लहाने संजय गायकवाड नारायण दवणे,अमोल झोल राम दहा तोंडे रामकिसन बोडके माऊली गोंडगे बाळासाहेब तोर् विठ्ठल कदम मुस्तफा पठाण,

जगदीश जाधव, भागवत पोटे पाटील तानाजी शेंडगे आकाश राऊत कपिल तिवारी राहुल बाहेकर सोपानराव खरात सोपानराव वायाळ अंकुशराव काळे, आबासाहेब सरकटे, शंकर बांडगे, पंजाब पुणेकर प्रल्हाद सरकटे अनसा बाई राठोड राठोड रावसाहेब खरात सोपानराव खरात अशोक राठोड जानकीराम चव्हाण सचिन राठोड गोपीचंद पवार, भगवान देशमुख, यांच्यासह हजारोच्या संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होत्या

Post Views: 95
Previous Post

महसूल कर्मचारी संपावर, नागरिकांची तहसीलीतील कामे रखडली*

Next Post

Budget 2024 in Marathi LIVE: अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळाची बैठक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
Budget 2024 in Marathi LIVE: अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळाची बैठक

Budget 2024 in Marathi LIVE: अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळाची बैठक

ताज्या बातम्या

वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

September 17, 2026
आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

September 17, 2026

रेल्वे विभागाच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर होणारा परिणाम

September 17, 2026
प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

September 17, 2026
महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

September 17, 2026
पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

September 17, 2026

दरमहा ५ तारखेपूर्वी वेतन द्या, ७ व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाचे परिपत्रक काढा

September 17, 2026
बाप रे! तेजस विमान, अर्जुन रणगाड्याची सोलापुरात निर्मिती 

बाप रे! तेजस विमान, अर्जुन रणगाड्याची सोलापुरात निर्मिती 

September 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1223643

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!