Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नीरेच्या पाण्यातून तिसंगी, चिंचोली तलावासह शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2024
in top news
0
नीरेच्या पाण्यातून तिसंगी, चिंचोली तलावासह शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नीरेच्या पाण्यातून तिसंगी, चिंचोली तलावासह शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार

पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिवसेनेचे आ.शहाजीबापू पाटील यांचे आश्वासन

सांगोला (तालुका प्रतिनिधी): नीरा देवधर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यात शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नीरा उजवा कालव्यामधून पाणी सोडून तिसंगी, चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार आहेत. तसेच गेल्या आवर्तनात ज्या फाट्यांना पाणी मिळाले नाही, त्या फाट्यांना या आवर्तनात प्राधान्याने पाणी देण्यात येणार आहे. पावसाळी आवर्तनात लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
यंदा सांगोला तालुक्यात दमदार पावसाची नोंद झाली असली तरी ग्रामीण भागातील विहिरी, ओढे, नाले कोरडेठाक पडलेले आहेत.

श्रावणात पाऊस पडेल या आशेवर शेतकर्‍यांनी पेरणी केलेल्या खरीप हंगामातील पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. नीरा खोऱ्यातील वीर, देवधर, भाटघर, गुंजवणी धरणांवर जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडल्यास ऐन पावसाळ्यात शेतातील जळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नीरा उजवा कालव्याचे आवर्तन चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नीरा उजवा  कालव्याच्या पाण्याचे वाटप करत असताना पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या सांगोला तालुक्याला तसेच तिसंगी तलावासाठी प्राधान्याने पाणी द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याकडे केली आहे.
नीरा उजवा कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील तिसंगी आणि सांगोला तालुक्यातील चिंचोली हे दोन्ही तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार आहेत.

तसेच गेल्या आवर्तनात ज्या फाट्यांना पाणी मिळाले नाही, त्या फाट्यांना या आवर्तनात प्राधान्याने पाणी देण्यात येणार आहे. पावसाळी आवर्तनात लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. नीरा उजवा कालव्यातून तिसंगी चिंचोली तलाव भरून तसेच फाट्यांना पाणी सोडल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे
शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Post Views: 29
Previous Post

बजेटमधील मोठ्या घोषणा काय?; A टू Z माहिती जाणून घ्या…

Next Post

सोलापूरात दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या तपासणीची मोहीम

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूरात दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या तपासणीची मोहीम

सोलापूरात दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या तपासणीची मोहीम

ताज्या बातम्या

राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय अभिवादन सभा

राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय अभिवादन सभा

May 30, 2026

बार्शीत युवकास लाकडी काठीने मारहाण; तिघांविरोधात तक्रार

May 30, 2026
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही – पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही – पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

May 30, 2026
वॉरियर्स आणि किंग्स संघांचे शानदार विजय; आदित्य चटके, श्रवण माळी सामनावीर 

वॉरियर्स आणि किंग्स संघांचे शानदार विजय; आदित्य चटके, श्रवण माळी सामनावीर 

May 30, 2026

अधिक महिन्यानिमित्त सांगोल्यात दररोज निघतात ३ दिंड्या 

May 30, 2026

मान्सूनपूर्व उपाययोजनांमध्ये दिरंगाईप्रकरणी नगर अभियंता सारिका आकुलवार यांची एक वार्षिक वेतनवाढ स्थगित

May 30, 2026

नालेकामात हलगर्जीपणा भोवला; झोन अधिकारी किशोर तळीखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

May 30, 2026

बेदम मारहाण; घरात घुसून केली मारहाण

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886078

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697