Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाची २९९ कोटींची निविदा प्रसिद्ध  – आ.शहाजीबापू पाटील

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 25, 2024
in top news
0
मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाचे दरवाजे उघडले – आमदार शहाजीबापू पाटील
0
SHARES
68
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाची २९९ कोटींची निविदा प्रसिद्ध  – आ.शहाजीबापू पाटील

आ.शहाजीबापूंची स्वप्नपूर्ती होणार….३९ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार

सांगोला ( तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील वंचित १२ गावांसाठी वरदायिनी असलेल्या बहुप्रतिक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा  सिंचन योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक १,२ व ३ पंपगृहाचे बांधकाम व उर्ध्वगामी नलिका क्र.१, २- अ, २-ब, व ३ चे बांधकाम तसेच वितरण कुंड क्रमांक १,२ व ३ चे बांधकाम, चिकमहूद व इटकी या मुख्य गुरूत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्थेचे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम करणे व पाणी वापर संस्था स्थापन करून सिंचन क्षेत्र हस्तांतरित करणे. पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम तसेच अजनाळे गुरूत्वीय नलिकेद्वारे सांगोला शाखा क्रमांक ५ साठी फिडर नलिकेच्या कामाची पहिल्या टप्प्यातील सुमारे २९९ कोटी २१ लाख ३३ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. या योजनेमुळे सुमारे ३९ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. तसेच दुसऱ्या टप्प्यातील २५० कोटींची निविदा एका आठवड्यात प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सन १९९७ मध्ये मंजूर झालेल्या ७३.५९ कोटी रुपयांच्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला २००० साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी १६ हजार एकर क्षेत्र यामध्ये समाविष्ट होते. सदर योजनेच्या कोणत्याही कामाला सुरुवात न झाल्याने मंजुरीनंतर २००६ साली याची प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली. आमदार झाल्यानंतर आ.शहाजीबापू पाटील यांनी २०२० सालापासून या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून नव्याने १२ वंचित गावे व सांगोला शाखा कालव्यावरील उच्च भागामध्ये असणारी गावे यासाठी प्रस्ताव तयार करून सुमारे ३९ हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला.

सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला २०२२-२३ च्या दरसुचीवर आधारित ८८३ कोटी ७८ लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रत्यक्ष कामासाठी ७८९ कोटी ५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर अनुषंगिक कामासाठी ९२ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बंदिस्त नलिका करण्यासाठी २५७ कोटी ३४ लाख ४६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तर पाणी वापर संस्था व प्रशिक्षण यासाठी ३ कोटी ५० लाख ६७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आस्थापना, संयंत्रे व इतर खर्चासाठी ९२ कोटी ८५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा करून या योजनेसाठी निधी उपलब्ध केला आहे.
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने १७ नोव्हेंबर 2022 मध्ये सांगोला उपसा सिंचन योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे  उपसा सिंचन योजना सांगोला असे नामकरण केले. या योजनेतून दीड टीएमसी पाणी बंदीस्त वितरण नलिकेतून लक्ष्मीनगर, अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, वाकी शिवणे, नरळेवाडी, य.मंगेवाडी, बंडगरवाडी, चिकमहूद, कटफळ, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी व इटकी या गावांतील सुमारे ३३ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तर अर्धा टीएमसी पाण्यातून सांगोला शाखा कालवा ५ वरील सुमारे ६ हजार एकर असे एकूण ३९ हजार एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Post Views: 27
Previous Post

मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी बैलकवाड यांचे स्वागत .

Next Post

कळंब आगाराच्या गळक्या गाडीत सुखाचा प्रवास..!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कळंब आगाराच्या गळक्या गाडीत सुखाचा प्रवास..!

कळंब आगाराच्या गळक्या गाडीत सुखाचा प्रवास..!

ताज्या बातम्या

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात, महाराष्ट्राचा शाहिरी बाणा : फोक आख्यानातून लोकसंगीताचा जल्लोष

February 14, 2026

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या सांगोल्यात गावभेटी

February 14, 2026

सोजर इंग्लिश स्कूल आयोजित आनंद बाजारात ४० हजारांची उलाढाल

February 14, 2026

रोजगार मेळाव्यात 44 उमेदवारांची निवड

February 14, 2026

महारेशीमचा शुभारंभ; 5 हजार एकरवर तुती लागवडीचे लक्ष्य

February 14, 2026

वंदे भारत एक्सप्रेस मध्ये साप ठेवणाऱ्याला अटक

February 14, 2026

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अफरोज सिद्दिकी यांची कार्यालयीन अधीक्षकपदी बढती

February 14, 2026

स्वच्छ व धूळमुक्त पंढरपूर कामास नगराध्यक्षाकडून सुरुवात

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679132

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697