Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्यभर पावसाचे थैमान! जनजीवन विस्कळीत!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 25, 2024
in top news
0
राज्यभर पावसाचे थैमान! जनजीवन विस्कळीत!
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई,२५ जुलै (हिं.स.) : राज्यभरात मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. मराठवाडा, विदर्भ, कोकण, मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोरदार कहर पहायला मिळाला. हवामान विभागाने पुढील ४८ तासांत पावसाचा जोर अधिक वाढेल असा इशारा दिला होता.

गेल्या ४८ तासांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंधेरी तसेच नवीन मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा मोठा फटका रेल्वेला बसला. मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

दरम्यान, मुंबईसह पुण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेनला देखील बसला. मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस उशिराने धावली.

मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने सखल भागात पाणी साचले अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, मालाड, बोरिवली या भागात पावसाचं पाणी साचल आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी समवेत दोन फुटापर्यंत पाणी भरले. त्यामुळे पोलिसांकडून अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. भारतीय हवामान खात्याकडून मुंबईसह ठाणे रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला.

मुंबईमध्ये मागील २४ तासांपासून पावसाने हाहाकार माजला आहे. त्यामुळे आता मुंबईतील गांधी मार्केट तसेच किंग सर्कल परिसरात पावसाचे पाणी साचले.

पुणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील शाळाही बंद ठेवण्याचे आदेश दिले. घाटमाथ्यांवरील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शाळांनाही सुट्टी देण्यात आली. लोणावळ्यातही पावसाने तुफान बॅटिंग केली होती आणि सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कायम दिसला. हवामान विभागाने रेड अलर्ट दिला.

सावित्री, कुंडलिका आणि अंबा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. ग्रामीण भागात पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. पालघरच्या वाडा विक्रमगड भागातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली.

कर्जत परिसरात संततधार पावसामुळे उल्हास नदी तुडूंब भरून वाहत होती. सखल भागात पाणी साचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. प्रशासनाने परिस्थितीची दखल घेऊन सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश दिले. बीड खांडपे, कोंडीवडे सालपे, नेरळ दहिवली, अंथरट वरेडी, वावे बेंडसे आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली.सातारा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, ठाणे, पालघर या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला. रत्नागिरीमध्येही जोरदार पाऊस पडत असून जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. संपूर्ण राज्यभरात पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post Views: 23
Previous Post

कळंब आगाराच्या गळक्या गाडीत सुखाचा प्रवास..!

Next Post

राज्यातील मत्स्य व्यवसायाला बळ देणार – मुनगंटीवार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार – मुनगंटीवार

राज्यातील मत्स्य व्यवसायाला बळ देणार - मुनगंटीवार

ताज्या बातम्या

प्रवाश्याचा मोबाईल चोरीस; जीवे मारण्याची धमकी

May 30, 2026

मोटारसायकल उभी केल्याच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण

May 30, 2026

कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून जवळपास ४ लाखांची फसवणूक

May 30, 2026
राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय अभिवादन सभा

राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय अभिवादन सभा

May 30, 2026

बार्शीत युवकास लाकडी काठीने मारहाण; तिघांविरोधात तक्रार

May 30, 2026
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही – पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही – पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

May 30, 2026
वॉरियर्स आणि किंग्स संघांचे शानदार विजय; आदित्य चटके, श्रवण माळी सामनावीर 

वॉरियर्स आणि किंग्स संघांचे शानदार विजय; आदित्य चटके, श्रवण माळी सामनावीर 

May 30, 2026

अधिक महिन्यानिमित्त सांगोल्यात दररोज निघतात ३ दिंड्या 

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886086

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697