एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे ॲक्शन मोडमध्ये
एटीएम मशीनसह रोख रककम पळवणारे चोरटे ताब्यात
वाळूज महानगर ( तरुण भारत ) गेल्या आठवड्यापासून सततच्या खुनांच्या घटनेने चर्चेत असलेले एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करत ॲक्शन मोड मध्ये आलेले आहे. त्यासोबतच दिनांक 22 एप्रिल रोजी निधी कृपा रेसिडेन्सी जय मल्हार चौक वडगाव पोलीस येथून दोन अज्ञात चोरट्यांनी अशोक लेलंड या कंपनीच्या 4 चाकी वाहनाच्या साहय्याने 7,46,100/- रुपये रोख रक्कम NCR कंपनीचे ATM मशीन सह सदरचे ATM ओढून गाडी मध्ये घालून चोरून नेले होते . याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता .
तपास अधिकारी सपोनि / श्री मनोज शिंदे यांनी अनुभवाच्या जोरावर तपास करत असताना 1) विष्णु रामभाऊ आकात रा. सातोना ता. परतुर जि. जालना याचे विरुध्द पुरावे मिळून आले. त्यावरून सदर आरोपीचा शोध घेत असतांना नमुद संशयीत आरोपी हा त्याचा साथीदार 2) देवा सुभाष तावडे रा पुंडलिकनगर ता. जि.छञपती संभाजीनगर याच्या सह पो.स्टे.शिवुर ता. वैजापुर येथे गुरनं 250/2024 कलम 310(4) (5) BNS प्रमाणे दाखल गुन्हयात मध्यवर्ती कारागृह हर्सल जेल येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सदर दोनही आरोपीतांना जेल मधून ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केली. तेव्हा आरोपी 1) विष्णु रामभाऊ आकात याने सांगीतले की,
दिनांक 20/04/2024 रोजी राजी पवननगर एन 9, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथून आशोख लेलंड कंपनीचा दोस्त मॉडेलचा टेम्पो ज्याचा क्रमांक MH 20 DE 3702 हा विष्णु आकात, व देवा तावडे यांनी चोरी केला होता. त्या चोरीच्या लेलंड टेम्पो, मध्ये विष्णू आकात व त्याचे साथीदार नामे 2) देवा सुभाष तावडे रा पुंडलिकनगर ता.जि. छञपती संभाजीनगर 3) लक्ष्मण अवधुत जाधव रा. वांगी ता.जि.नांदेड, 4) लकी सुभाष तावडे रा. पुंडलिकनगर ता.जि. छञपती संभाजीनगर (5) महेश लक्ष्मण आकात रा.सातोना ता.परतुर जि.जालना, हे दिनांक 21/04/2024 रोजी सिडको वाळूज महानगर भागात फिरत असतांना दिनांक 22/04/2024 रोजी रात्रीचे 03.00 वाजताचे सुमारास वडगाव कोल्हाटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर HDFC बँकेचे ATM दिसले. सदर ATM निर्मणुष्य ठिकाणी असल्याने त्यांनी सदर ATM चोरी करण्याचे ठरवले. त्यांच्याकडे असलेल्या चोरीच्या लेलंड गाडीस दोर व साखळी बांधून ATM ओढून ATM व ATM मधिल 7,46,100/- रुपये चोरी केले. त्यानंतर सदर ATM व ATM चे तुकडे गाडी मध्येच करून त्यातील पैसे काढून ते आपसात वाटून घेतले.
त्यानंतर ATM मशीन व त्याचे टुकडे, मानवत जि. परभणी शिवारातील एका शेतातील विहीरीत टाकून दिले. अशी कबुरी दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून झोडगाव गट नं 237 ता. मानवत जि.परभणी येथील जानकीराम दगडुबा पवार यांचे मालकीच्या शेतातील 50 फुट खोल विहीरी मधील पाणी दोन दिवस सतत विदुत पंपाच्या सहाव्याने उपसा करून विहीरीमध्ये टाकलेले ATM मशीन, त्याचे तुकडे, बाहेर काढून जप्त करण्यात आले आहेत. तसेच आरोपीतांनी ATM मधिल चोरी केलेले 3,80,000/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले. अशा तपासाधिकारी मनोज शिंदे यांनी तांत्रिक प्रयोगाच्या आधारे एका गंभीर गुन्ह्याची उकल करण्यास यश मिळवले .
सदरची कामगिरी ही मा.श्री प्रविण पवार, पोलीस आयुक्त, मा. पोलीस उप आयुक्त श्री नितीन बागटे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. महेंद्र देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कृष्णा शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शना खाली सपोनि / श्री मनोज शिंदे (तपास अधिकारी), पोअं. गणेश सागरे, यशवंत गोवाडे, सुरेश भिसे, चालक प्रशांत सोनवणे, जालिंदर रंधे, पोउपनि/ श्री प्रविण पाथरकर, सफौ.विलास वैष्णव, विनोद नितनवरे, समाधान पाटील, विशाल पाटील, नितीन इनामे, हनुमान ठोके, बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे यांनी केली .