उमरीत पाच ऑगस्टपासून आचार्य गजेंद्र चैतन्यजी महाराज यांची
शिवमहापुराण कथा
उमरी ( प्रतिनिधी )
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार श्री लहरी बाबा कृपांकित परमपूज्य आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांची उमरी शहरातील वामन तीर्थ महादेव मंदिरात शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे.
दिनांक ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान दररोज दुपारी एक ते चार या वेळात शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी शहरातून शोभायाञा काढण्यात येणार आहे.या धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ओम नमो शिवाय भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आह