घनसावंगी मतदारसंघातील गरीब कुटुंबांना सतीश घाटगेंनी मिळून दिले हक्काचे घर
तभा वृत्तसेवा
घनसावंगी अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
घनसावंगी अहिल्यादेवी होळकर योजनेतून 1254 कुटुंबांना घरकुल मंजूर
घनसावंगी: राज्य सरकारच्या विविध महत्वकांशी योजना प्रभावीपणे घनसावंगी मतदारसंघात राबविण्याचे काम भाजपा नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे करत आहेत. नुकतेच राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतून घनसावंगी मतदारसंघातील खऱ्या गरीब १२५४ कुटुंबांना सतीश घाटगे यांच्या प्रयत्नातून घरकुल मंजूर झाले असून सतीश घाटगे यांच्या हस्ते घरकुलाचे पत्र लाभार्थ्यांना वाटप करण्यास सुरवात झाली आहे.
राज्यातील भटक्या विमुक्त व फिरस्ती करून जीवन जगणाऱ्या घटकांना हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत घनसावंगी, अंबड व जालना तालुक्यातील १२५४ कुटुंबांना सतीश घाटगे यांच्या प्रयत्नातून हक्काचे घर मंजूर झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या सहकार्यातून सतीश घाटगे यांनी या गरीब कुटुंबांना घरकुल मंजूर केले आहे. घनसावंगी मतदारसंघातील गरीब कुटुंबांना मंजूर झालेल्या घरकुलाचे पत्र सतीश घाटगे यांच्या हस्ते मंगळवारी वाटप करण्यात आले. मंगळवारी भार्डी, गोंदी, तळेगाव येथे घरकुल मंजुरीचे पत्र लाभार्थ्यांना सतीश घाटगे यांच्या हस्ते देण्यात आले. मंजुरीचे पत्र मिळाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला. घरकुल मंजूर करून दिल्याबद्दल सतीश घाटगे पाटील यांचे व राज्य सरकारचे आभार मानले.
अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र देताना सतीश घाटगे पाटील.
तालुका निहाय मंजूर झालेले घरकुल
जालना- ४९
अंबड- ५५९
घनसावंगी -६४६