मुदखेड शहरात विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
मुदखेड ता प्र
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी त्यांच्या फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सहायक पोलीस निरीक्षक बी.आर. कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, डीएसबी चे किशोर पाटील,यांची उपस्थिती होती.
शहरातील वीरशैव गवळी समाज सभागृहात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिवादन करण्यात आले यावेळी संजय आऊलवार, उत्तम चव्हाण,प्रवीण काचावार, चांदु बोकेफोड, यासह आदी उपस्थित होते.
तसेच काँग्रेस पक्ष कार्यालयात तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, शहराध्यक्ष कैलास अण्णा गोडसे, यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी महंमद गौस, सूर्यकांत चौदंते, मुजीब पठाण, अविनाश चौदंते, आकाश सोनटक्के,यासह आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.