*तालुका गुरू गौरव पुरस्कार वितरित करा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी*
मुदखेड ता प्र
मुदखेड तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा गुरू गौरव पुरस्कार गेल्या चार वर्षांपासून देण्यात आला नसून तो लवकर वितरीत करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गटाचे) शहराध्यक्ष मोहम्मद बुराण यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांच्या कडे केली आहे .
दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरू गौरव पुरस्कार तालुकास्तरावर वितरीत केला जातो, आपले अध्यापन कार्य उत्तमरीत्या पार पाडणारे शिक्षक यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो, परंतु २०२० पासून गेली चार वर्षे ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले नाही.
तरी लवकर या तालुका गुरू गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी तालुक्यातील शिक्षकांचा गुरुगौरव पुरस्कार आयोजित करत शिक्षकांचा गौरव करण्यात येतो परंतु मागील चार वर्षापासून २०२० नंतर सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. तरी लवकर या तालुका गुरू गौरव पुरस्कार वितरित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष मोहम्मद बुराण, गजानन बोडखे,दिलीप सरोदे, शेख मुखीद जानेमिया ,हनुमंत नटुरे , गजानन बोडके ,शेख इरफान ,म.साजिद,म. खाजा शेख हकिम,संतोष दर्शनवाड,ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.