बळीराम जगताप
वाशी धाराशिव
९४२१३५२७३८
लाडकी बहीण योजना परांडा विधानसभा समिती सदस्य पदी वाशी येथील सुरेश बाप्पा कवडे यांची निवड!
लाडकी बहीण योजना परंडा विधानसभा समिती सदस्य भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वाशी येथील उपनगराध्यक्ष सुरेश बप्पा कवडे यांची निवड झाली. त्याबद्दल वाशी तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या निवडणुकीमुळे परंडा-भूम-वाशी मतदार संघातील लाडक्या बहिणीचे शंभर टक्के काम होणार असल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
बप्पाची निवड झाल्याबद्दल वाशी तालुका भाजपा अध्यक्ष राजगुरू कुकडे महाराज, धनंजय कुलकर्णी, महादेव आप्पा आखाडे, कुलकर्णी प्रशांत, तात्या लोकरे, महिला आघाडी अध्यक्ष त्रिशाला देशमुख तसेच मित्र मंडळ पत्रकार बांधव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या; व पुढील कार्यास सुयश चिंतले.