संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी
मंठा शहरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत शिरोमणी श्री सावता महाराज यांची पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. येथील बोराडे गल्लीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्री सावता माळी महाराज यांच्या मूर्तीचा अभिषेक व पूजा करून महाआरती करण्यात आली. याप्रसंगी ह भ प राम महाराज नालेगावकर यांच्या कीर्तनानंतर या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. याप्रसंगी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते