भोकर(अरुण डोईफोडे)गेली दहा वर्षापासून भोकर नगरपरिषदेची सेवा करुनही कोणतेही कारण नसताना पूर्व कल्पना न देता अचानक नगरपरिषदेकडून कंत्राटी महिला कर्मचारी महानंदा मोटेकर यांना कामावरुन कमी करण्यात आले असून पालीकेकडे सदर महिला कर्मचार्यांचे चार महिन्याचे मानधन थकित आहे परिणामी सदरील महिलेवर उपासमारीची वेळ आली राहिलेले थकित मानधन देवून पूर्ववत कामावर रूजू करुन घेण्यात यावे याकरिता दि.५ आॅगष्ट पासून महानंदा नागोराव मोटेकर या कंत्राटी महिला कर्मचारी नगरपरिषदेसमोर अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महानंदा मोटेकर मागील दहा वर्षापासून भोकर नगरपालीकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत त्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरुन कमी करण्यात आले त्यांचेवर उपासमारीची वेळ आली भोकर नगरपालीकेने महात्मा फूले सेवा भावी संस्था आष्टी ता.हदगाव या संस्थेला स्वच्छतेचे कंत्राट दिले सदरील कंत्राटदाराकडे सदर कंत्राटी महिला कर्मचारी महानंदा मोटेकर यांचे चार महिन्याचे मानधन थकित असताना सदरील कंत्राटदाराने या महिलेला कामावरुन कमी करण्यात आल्याचे सांगून कामावर येवू नकोस
असे म्हणत अरेरावीची भाषा सदर कंत्राटदार वापरत असल्याचे निवेदनात नमूद असून भोकर नगरपरिषद प्रशासनाने सदरील महिलेला पूर्ववत कामावर रुजू करुन घेवून न्याय मिळवून द्यावा अन्यथा कामावर जो पर्यंत घेणार नाही तो पर्यंत नगरपरिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण सूरुच ठेवणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे