Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्षरओळख नसलेल्या पालकांचा मुलगा झाला पीएसआय

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 4, 2024
in maharashtra
0
अक्षरओळख नसलेल्या पालकांचा मुलगा झाला पीएसआय
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्षरओळख नसलेल्या पालकांचा मुलगा झाला पीएसआय

तांड्यावरच्या मुलाची यशाला गवसणी

विशाल पवार

देगलूर/प्रतिनीधी
आई-वडील दोघेही निरक्षर, कोरडवाहू दोन एकर शेती त्यामुळे मजुरी हाच मुख्य व्यवसाय; पण मुले शिकली पाहिजेत, अशी पालकांची जिद्द, आश्रम शाळेमध्ये शालेय शिक्षण पुर्ण करुन , डी.एड. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘टीईटी’च्या तयारीसाठी लातूरला आलेल्या विठ्ठल राठोड यांना इथे स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली. त्यात चारवेळा अपयश आल्यावरही जिद्द सोडली नाही. संयम ठेवून अभ्यासात सातत्य ठेवल्याने पाचव्या प्रयत्नात तांड्यावरचा हा मुलगा ‘पीएसआय’ झाला.

सावळी तांडा येथील रहिवासी असलेले विठ्ठल वसंतराव राठोड. आई-वडील मजुरी, शेळ्या सांभाळून घरगाडा चालवितात. दोन मुले, एक मुलगी असे छोटंसं कुटंब, मोठा मुलगा विठ्ठल याचे पूर्ण शिक्षण आश्रमशाळेत झाले. उदगीरच्या आश्रमशाळेत अकरावी, बारावी झाल्यावर डी.एड. केले. शिक्षक व्हायचे म्हणून ‘टीईटी’ची तयारी करण्यासाठी ८ वर्षांपूर्वी गावातून लातूरला आलेल्या विठ्ठल राठोड यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. मग काय ‘टीईटी’चा नाद सोडला अन् स्पर्धा

योग्य मार्गदर्शक, जिद्द, संयम, अभ्यासात सातत्य महत्त्वाचे…

* स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना संयम महत्त्वाचा आहे. अपयश आले म्हणून खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. योग्य मार्गदर्शन मिळाले की मन एकाग्र राहते. सतत प्रयत्न करीत राहावेत. मला चारवेळा अपयश आले. वर्ष २०१८ मध्ये गुप्त वार्ता अधिकारी म्हणून निवड झाली; पण उंची मायक्रो २ मध्ये कमी पडल्याने अपयश आले. तरीही खचून न जाता मार्गदर्शक प्रा. सुधीर पोतदार यांच्या मार्गदर्शनात अभ्यासात सातत्य ठेवले.

* डी.एड. असतानाही शिक्षक पदासाठी कुठलीच परीक्षा दिली नाही. जे लक्ष्य ठेवले त्यात यश मिळाले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम, अभ्यासात सातत्य ठेवावे, असा सल्ला पीएसआय विठ्ठल राठोड यांनी दिला आहे.परीक्षेच्या अभ्यासात मन रमले. तब्बल तीन वेळा पूर्व परीक्षेत अपयश आले. चौथ्यावेळी मुख्य परीक्षा पास झाल्यावर मुलाखतीत अनुत्तीर्ण झाले. तरीही संयम ठेवला. पाचव्यांदा यश आले, निकाल जाहीर होताच मित्रपरिवार अन् ग्रामस्थांनी कौतुकाचा वर्षाव सुरू केला. अक्षर ओळख नसलेल्या पालकांच्या कौतुकासाठी ग्रामस्थांची रीघ लागली. मार्गदर्शक प्रा. सुधीर पोतदार यांच्या हस्ते लातूरमध्ये भव्य सत्कार करण्यात आला. मित्रांनीही पेढे भरवून कौतुकाचा वर्षाव केला.

दोन्ही भावंडे झाले अधिकारी…

अक्षर ओळख नसलेल्या आई-वडिलांनी दोन्ही मुलांना जिद्दीने शिक्षण दिले. मुलांनीही पालकांच्या कष्टाचे चीज केले. लहान मुलगा भरत राठोड हा दहा महिन्यांपूर्वीच कर सहायक झाला.
• आता मोठा मुलगा विठ्ठलही पीएसआय झाला, दोघांच्या यशाने कुटुंब आनंदी झाल्याचे वडील वसंतराव राठोड यांनी सांगितले.

योग्य मार्गदर्शक, जिद्द, संयम, अभ्यासात सातत्य महत्त्वाचे…

* स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना संयम महत्त्वाचा आहे. अपयश आले म्हणून खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. योग्य मार्गदर्शन मिळाले की मन एकाग्र राहते. सतत प्रयत्न करीत राहावेत. मला चारवेळा अपयश आले. वर्ष २०१८ मध्ये गुप्त वार्ता अधिकारी म्हणून निवड झाली; पण उंची मायक्रो २ मध्ये कमी पडल्याने अपयश आले. तरीही खचून न जाता मार्गदर्शक प्रा. सुधीर पोतदार यांच्या मार्गदर्शनात अभ्यासात सातत्य ठेवले.

* डी.एड. असतानाही शिक्षक पदासाठी कुठलीच परीक्षा दिली नाही. जे लक्ष्य ठेवले त्यात यश मिळाले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम, अभ्यासात सातत्य ठेवावे, असा सल्ला पीएसआय विठ्ठल राठोड यांनी दिला आहे.परीक्षेच्या अभ्यासात मन रमले. तब्बल तीन वेळा पूर्व परीक्षेत अपयश आले. चौथ्यावेळी मुख्य परीक्षा पास झाल्यावर मुलाखतीत अनुत्तीर्ण झाले. तरीही संयम ठेवला. पाचव्यांदा यश आले, निकाल जाहीर होताच मित्रपरिवार अन् ग्रामस्थांनी कौतुकाचा वर्षाव सुरू केला. अक्षर ओळख नसलेल्या पालकांच्या कौतुकासाठी ग्रामस्थांची रीघ लागली. मार्गदर्शक प्रा. सुधीर पोतदार यांच्या हस्ते लातूरमध्ये भव्य सत्कार करण्यात आला. मित्रांनीही पेढे भरवून कौतुकाचा वर्षाव केला.

Post Views: 35
Previous Post

अचानक कामावरुन कमी करण्यात आल्याने भोकर नगरपरिषदेविरोधात महिलेचे अमरण उपोषण

Next Post

राज्य सरकारने बार्टी,सारथी,आर्टी व महाज्योती च्या धर्तीवर मार्टी ची स्थापना करावी – प्रा.अमर शेख 

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राज्य सरकारने बार्टी,सारथी,आर्टी व महाज्योती च्या धर्तीवर मार्टी ची स्थापना करावी – प्रा.अमर शेख 

राज्य सरकारने बार्टी,सारथी,आर्टी व महाज्योती च्या धर्तीवर मार्टी ची स्थापना करावी - प्रा.अमर शेख 

ताज्या बातम्या

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी १४ जूनला ऑनलाईन योग सत्र

June 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी

June 13, 2026
जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

 जिल्हा परिषदेत ९९ केंद्रप्रमुखांचे समायोजन शिक्षण व्यवस्थेला नवे बळ

June 13, 2026
टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

June 13, 2026
पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

June 13, 2026

१५ तोळे सोने व ४ लाख ८० हजार रोख रक्कम स्कुटीच्या डिकीतून लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0907168

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697