सोनखेड (तभा वृत्तसेवा) काल दि 5 रोजी नांदेड कडून येणाऱ्या बस वर समोरासमोर धडक दिल्याने 31 वर्षीय तरुण जागीच ठार झाला
नांदेड कडून रात्री साडे आठ वाजताचे सुमारास येणारी नांदेड कंधार बस क्रमांक एम एच 14 बी टी 3014 ही जाणापुरी जवळ येत असताना
मोटारसायकल क्रमांक एम एच 22 बी बी 1889 ही चालवत असलेला शेख जावेद शेख नबी (वय 32) रा धानोरा(मो) ता पूर्णा जि परभणी हा डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाला माहिती समजताच सोनखेड पोलीस ठाण्याचे सपोनि माने साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ जाऊन मयत शेख जावेद यास विष्णुपुरी येथे दवाखान्यात दाखल केले मयताच्या नातेवाईक यांनी अजून पर्यंत पोलीस ठाण्यास कुठलीही फिर्याद दिली नसल्याचे पोलिसांनी कळवले आहे