मंठा प्रतिनिधी :
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल तसेच आरक्षणाबाबत आक्षेपहार्य वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे व खा.नारायण राणे यांचा मंठा तालुक्यातील केंधळी येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करून जोडे मारो आंदोलन करत प्रतिमेचे दहन करण्यात आले.
याप्रसंगी सकल मराठा समाज बांधवांनी ” एक मराठा लाख मराठा” नारायण राणे कोंबडीचोर अशा आशयाचे फलक हातात घेऊन विविध घोषणा दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.