वाळूज महानगर ( तरुण भारत प्रतिनिधी) बजाजनगरातील मोहटादेवी ते सिडको कडे जाणाऱ्या रस्त्यावर एमआयडीसीच्या वतीने गतिरोधक टाकण्यात आले होते परंतु गतिरोधकाची उंची जास्त असल्याने तसेच त्यावर पांढरे पट्टे नसल्याने अनेकवेळा महिला दुचाकी आदळून अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. नागरीकांना या विषयी ओरड केल्यानंतर या मार्गावरील गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू झाले आहे.
बजाजनगरातील मोहटादेवी ते सिडको कडे जाणाऱ्या रस्त्यावर वर्दळीमुळे अपघातांची जास्त शक्यता असल्याने तिथे गतिरोधक व्हावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश येऊन काही दिवसापूर्वीच या रस्त्यावर गतीरोधक उभारण्यात आले होते
परंतु त्यावर पांढरे पट्टे नसल्याने वाहन आदळून अपघाताचे प्रमाण वाढले होते. याची अनेक प्रसिद्धी माध्यमाने दखल घेत वृत्त प्रकाशित केले होते. या रस्त्यावर शाळेतील मुले, ज्येष्ठ नागरिक यांची वर्दळ जास्त प्रमाणात असते. येथे अपघात होत असल्याने या गतिरोधकांवर रंबलर स्ट्रीप किंवा पांढरे पट्टे मारण्याच्या ग्रामस्यांच्या मागणीला अखेर यश आले असून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला आहे.