भोकरदन : सुंदर भोकरदन स्वच्छ भोकरदन हे भोकरदन वाशीयांचे स्वप्न असून शहरातील दलित वस्तीमध्ये मुस्लिम वस्तीमध्ये आणि गरिबांच्या घरापुढे आणि गल्ल्यांमध्ये अस्वच्छता असून नाल्या नाहीत रोड नाहीत रस्ते नाहीत. मोठ्या नेत्यांनी आतापर्यंत नगरपरिषदेचा निधी स्वतःच्या प्लॉटिंग मध्ये रस्ते करण्यासाठी आणि स्वतःच्या गल्लीमध्ये कामे करण्यासाठी खर्च करून गरीब समाजाकडे दुर्लक्ष केलेले आहे.
ती उणीव भरून काढण्यासाठी फक्त गरीब लोकांच्या वस्तीमध्ये कामे करण्यासाठी आम आदमी पार्टीने जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे साहेबांच्या कडे 100 कोटी रुपयांची मागणी केली असून तसा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी SDM तथा प्रशासक नगरपरिषद भोकरदन यांनी तयार करून मा.डाॅ. कल्याण रावजी काळे साहेबांकडे तसेच शासनाकडे पाठवावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.तशा प्रकारचे पत्र माननीय खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब तसेच SDM भोकरदन यांना देण्यात आलेले आहे पत्रामध्ये पुढे म्हटले आहे की भोकरदन नगरपरिषद सध्या प्रशासकाच्या ताब्यात आहे.त्यामुळे शासनाकडून येणारा निधी नगरपरिषदेला प्राप्त झालेला नाही.
त्यामुळे दलित वस्ती मुस्लिम वस्ती व इतर गरीब समाजाच्या वार्डामध्ये कोणतेही विकास कामे झालेले नाहीत. सर्व विकास कामे बंद आहेत. अनेक ठिकाणी नाल्या टाकाव्या लागणार आहेत. अनेक ठिकाणी रोडची कामे करावे लागणार आहेत.पाण्यासाठीच्या पाईपलाईन नादुरुस्त आहेत. अंडरग्राउंड पाण्याच्या नाल्या काढण्यासाठी आणि इतर विकास कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे.
उदाहरणा दाखल एकट्या रफिक कॉलनी नावाच्या वार्डामध्ये पाच कोटी रुपये विकास कामासाठी लागणार आहेत. त्यामुळे आपणास नम्र निवेदन देण्यात येते की शासनाकडून 100 कोटी रुपये भोकरदन नगर परिषदेसाठी मंजूर करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी ही विनंती. निवेदनाची एक प्रत माननीय उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगर परिषद भोकरदन यांना विकास कामाचा आराखडा तयार करून शासनाकडे व माननीय खासदार साहेबांना सादर करण्यासाठी देण्यात आलेली आहे.
यावेळी शहराध्यक्ष महजाद इस्लाम खानआम आदमी पार्टी भोकरदन KGN अक्वा भोकरदन जनार्दन सोळुंके बोरसे गुरुजी लिलाबाई टेकाळे फारुख भाई फिरोज भाई अनिल पगारे धनराज भारती बाबर शहा बाबर शेख जुनेद जाहिद शेख शब्बीर शेख महिला कार्यकर्ता विकास हिवाळे इमरान पत्रकार करीम लाला कादरी, सद्दाम मिर्झा, मोईद्दीन शहा, फिरोज शहा, अझम शहा, सरफराज शहा नकीब शहा,रशीद शहा, आबरार शहा, शाहरुख शहा यांच्यासह नागरीक हजर होते.