78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा अर्धापूर शहरातील एज्युव्हीजन प्रायमरी स्कूल मध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.किशोरजी देशमुख, रिटायर मिल्ट्री मॅन नागनाथ वायाळ , प्रिन्सिपल, पालक वर्ग, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. एज्युव्हीजन शालेय परिसरात ध्वजारोहण स्कूलचे संचालक श्री प्रवीण रावते सर व ॲड.किशोरजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण सादर केले तसेच नृत्य सादर केले. छाया टीचर व अलका टीचर यांनी स्वतंत्र दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.
काही विद्यार्थ्यांनी विविध स्वतंत्र सैनिकांचा तसेच भारत मातेचा जवानांचा पेहराव घालून देशभक्ती प्रति जनजागृती केली. कार्यक्रमानंतर अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यावरून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली . अर्धापुर शहरातील मुख्य रस्ता स्वातंत्र्य दिनाच्या घोषणांनी दुमदुमला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक चवडकर सरांनी केले तर आभारप्रदर्शन अशितोष पुरी सरांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद ,HOD प्रतिक चवडकर यांनी परिश्रम घेतले,शाळेचे प्रिन्सिपल सौ .प्रिया रावते मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले