वाळूज महानगर प्रतिनिधी : संकल्प शिक्षण व सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित लोहोकरे पब्लिक स्कूल कमलापूर या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल लोहकरे संचालिका सोनू ताई लोहकरे , संस्थापक सचिव डॉक्टर बी.जी गायकवाड.प्रशासकीय अधिकारी डॉ. संजय काळे,उपसरपंच नजीर पठाण, दीपक गजभार, कल्याण पाठे, रफिक पठाण, रामनाथ लोहकरे, छायाताई बोंबले ,
अशपाक बेग, प्रमोद नारळे, व्यवस्थापक राजू गोरे, शकुंतलाताई गोरे , पालक प्रतिनिधी चाबुकस्वार यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा गोरे यांनी केले. या निमित्ताने लो लोहकरे पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, वेशभूषा, मुकअभिनय, महाराष्ट्र गीत आदी कलाप्रकार सादर केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख सुप्रिया दांडगे, पुजा भोंडेकर,प्रियंका गायकवाड ,विठ्ठल वरणकर ,विनोद दांडगे ,योगेश आरसेवाड ,अंजली सावदकर अनुराधा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. त्या कार्यक्रमाचे आभार राठोड यांनी केले.




















