भोकर (प्रतिनिधी)ओबीसी आरक्षण बचावासाठी भोकर येथे दि.१८ रोजी ओबीसी आरक्षणाचे योधे प्रा.लक्ष्मणराव हाके यांच्या उपस्थितीत आरक्षण बचाव मेळावा घेण्यात येत असून जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांनी केले आहे.
ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत असून ओबीसींच्या न्याय हक्काचे आरक्षण हिरावून घेतल्या जात आहे अशा गंभीर परिस्थितीत सर्वत्र ओबीसी आरक्षण बचाव मेळावे घेण्यात येत आहेत ओबीसी बांधवांची संघटन शक्ती मजबूत होत आहे ,
भोकर येथे दि.१८ रोजी रविवारी ओबीसी आरक्षणाचे योधे प्रा.लक्ष्मणराव हाके यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षण बचाव मेळावा सकाळी ११ वाजता मोंढा मैदान येथे होणार असून सकाळी नऊ वाजता उमरी चौक येथून पारंपारिक वेशात भव्य रॅली काढण्यात येणार आहे या भव्य मेळाव्यास जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भोकर तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.


















