नवीन नांदेड प्रतिनिधी
विष्णूपुरी, नांदेड येथील सहयोग सेवाभावी संस्थेअंतर्गत इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. सय्यद अन्सार यांना सनराइज् विश्वविद्यालय अलवर राजस्थान च्या वतीने विद्यावाचस्पती अर्थातच पीएच.डी. ही पदवी घोषित करण्यात आली.
सदरील पीएच.डी.अभ्यासासाठी डॉ. भारत वासुदेव टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. सय्यद अन्सार यांनी औषधनिर्माणशास्त्र या विषयांतर्गत डेव्हलप अँड कॅरेक्टराईज सुपर प्यारामॅग्नेटिक आयार्न ऑक्साईड नॅनो पार्टिकल्स फॉर टुमर टारगेटिग टु अमिलोरेट डॉक्स असोसिएटेड कॉर्डियोटॉक्सिसिटी या विषयावर अलवर, राजस्थान येथील सनराइज् विश्वविद्यालयाकडे शोधप्रबंध सादर केला आहे.
प्रा. सय्यद अन्सार यांनी पीएच.डी. ही पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. संतुक हंबर्डे, प्राचार्य डॉ.विजय नवघरे, प्राचार्य सुनील हंबर्डे, संचालिका डॉ. गझला खान, व्ही. बी. स्वामी, प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर, प्रा डॉ सूर्यकांत जाधव,प्रा जमीरुद्दीन,डॉ प्रवीण कारले,डॉ प्रवीण मुळी, डॉ. पल्लवी कांबळे, प्रा. हजेरा खान, प्रा.सोनाली भगत प्रा. मेघा गाजले,प्रा. सुरज शिंदे, प्रा. राजू कदम, प्रा. मंगेश पतंगे, प्रा.डाकोरे तसेच त्यांचे सहकारी व मित्र मंडळींकडून प्रा.सय्यद अन्सार यांचे स्वागत करण्यात आले.