===================
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते करणार भाजपामध्ये प्रवेश
====================
भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांची माहिती
====================
परतूर/प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये परतुर येथील गजानन मंगल कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीचा मेळावा संपन्न होणार असल्याचे भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटलेले आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेला परतुर मतदार संघाचा विकास ध्यानात घेऊन, भारतीय जनता पार्टीमध्ये शेकडो कार्यकर्ते उद्या प्रवेश करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजित दादा पवार यांच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी परतुर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केलेली आहेत, हे सर्व श्रुत असून दीनदलित पीडित या सर्वांनाच आधार देण्याचे काम आमदार लोणीकर यांनी केलेले आहे या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रविष्ट होणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
















