Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भविष्यात मुंबईसह किनारी भागांना धोका, संशोधनासाठी नासाचे खास रोबोट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 8, 2024
in top news
0
भविष्यात मुंबईसह किनारी भागांना धोका, संशोधनासाठी नासाचे खास रोबोट
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, ८ सप्टेंबर (हिं.स.) : येत्या 16 वर्षांत म्हणजे 2050 पर्यंत जगासह भारतातील अनेक देश, बेटे आणि किनारपट्टीवरील किमान 13 शहरे समुद्रात बुडतील, असा दावा शास्त्रज्ञांनी अनेकदा केला आहे. मुंबईचे 13 टक्के क्षेत्र म्हणजे 830 चौरस किलोमीटर समुद्रात बुडणार आहे. याच पार्श्वभूमीवर नासाच्या शास्त्रज्ञांनी समुद्राची वाढती पाण्याची पातळी मोजण्यासाठी खास रोबोट तयार केले आहेत. हे रोबोट पाण्याखाली पाठवले जात आहेत. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे. त्याचे नाव ‘IceNode’ आहे. या मोहिमेत नासाचे शास्त्रज्ञ अंटार्क्टिकाच्या बर्फाळ थराखाली समुद्राखाली स्वायत्त पाण्याखालील रोबोट सोडत आहेत. ते समुद्राखालून अंटार्क्टिकाचा अभ्यास करतील.

भविष्यात ग्लोबल वॉर्मिंग आणि मानवाच्या समुद्रावरील अतिक्रमाणाचे भयानक परिणाम भोगावे लागणार आहेत. पुढील काही वर्षांत भारतातील मुंबई, कोची, मंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरमसारख्या मोठ्या शहरांची किनारपट्टी अतिशय लहान होण्याचा धोका आहे. शतकाच्या अखेरीस जलमय झालेल्या क्षेत्राचे प्रमाण 1377.12 चौरस किलोमीटरपर्यंत वाढेल. 2150 पर्यंत मुंबई पाण्यात नाहीशी होईल.

यावर्षी मार्च महिन्यात नासाच्या शास्त्रज्ञांनी अलास्काच्या ब्युफोर्ट समुद्रात बर्फाच्या जाड पृष्ठभागापासून 100 फूट खाली सिलिंडरसारखा रोबोट तैनात केला होता. असे अनेक रोबोट अंटार्क्टिकामध्ये तैनात करण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व रोबोट बराच काळ बर्फाच्या जाड थराखाली वितळणारा बर्फ आणि समुद्राच्या वाढत्या पातळीची माहिती गोळा करतील.

अंटार्क्टिका हा असा खंड आहे जिथे फार कमी लोकांचा वावर आहे. या खंडाचं आरोग्य बिघडल्यास संपूर्ण जग हादरून जाईल. तेथीच ऋतू बदल संपूर्ण जगावर परिणाम करतात. त्यामुळे तिथे अशी उपकरणं बसवणं गरजेचं आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भविष्यातील आपत्तींची सविस्तर माहिती मिळू शकेल.

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, अंटार्क्टिकातील संपूर्ण बर्फ वितळला तर जगातील जवळपास सर्व समुद्रांची पाण्याची पातळी 200 फुटांनी वाढेल. अशावेळी भारतातील अनेक किनारी राज्यांचा मोठा भाग पाण्याखाली जाईल. जगाच्या नकाशावरून अनेक बेटं नाहीशी होतील. समुद्र पाहण्यासाठी आपल्याला मुंबई किंवा चेन्नईसारख्या ठिकाणी जावं लागणार नाही. समुद्राची पाणी पातळी वाढल्यास पुणे आणि बेंगळुरूसारख्या शहरांमध्येच समुद्र बघता येईल. जसजशी उष्णता वाढत आहे तसतसं ग्लोबल वार्मिंग वाढत आहे. हिमनद्या आणि अंटार्क्टिकातील बर्फ वेगाने वितळत आहेत.

Post Views: 7
Previous Post

महाराष्ट्रात कारागृहातील बंदीसाठी मुक्त विद्यापीठाचा स्तुत्य उपक्रम

Next Post

नवदीप सिंगला रौप्य नव्हे तर ‘सुवर्ण’! भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नवदीप सिंगला रौप्य नव्हे तर ‘सुवर्ण’! भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं

नवदीप सिंगला रौप्य नव्हे तर 'सुवर्ण'! भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677121

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697