तभा वृत्तसेवा मुदखेड:
शिवसेना उबाठा गटाचे मुदखेड शहर संघटक सुधाकर सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष बबन बारसे यांना देऊन भाजपात प्रवेश.
नवीन पक्षात आलेल्या लोकांना पद दिले जात आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात एकनिष्ठ पणे काम करणाऱ्यावर अन्याय होत आहे. हा अन्याय किती दिवस सहन करायचा तालुक्यातील तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख यांचा भोकर मतदारसंघकडे व मुदखेड शहराकडे लक्ष नसून यांनी फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आजपर्यंत वापर करून घेतला आहे. यांच्या एकाधिकार शाहिला कंटाळून शिवसेना उबाठा गटाला राम राम करीत भाजपात जाणार असल्याची माहिती सुधाकर सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे