Wednesday, February 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपाने आमदार टी. राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 11, 2025
in political
0
भाजपाने आमदार टी. राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हैदराबाद, 11 जुलै (हिं.स.) – तेलंगाणामधील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार टी. राजा सिंह यांनी प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला होता. दरम्यान आता भाजप पक्ष नेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आमदार राजा सिंह यांनी एन. रामचंदर राव यांना भाजपाचे तेलंगाणामधील प्रदेशाध्यक्ष बनवल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी पक्ष नेतृत्वावर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष आणि चुकीचे नेतृत्व निवडल्याचा आरोप केला होता. मात्र हिंदुत्वाच्या विचारसरणीशी आपली कटीबद्धता कायम राहील, अशी भावना व्यक्त केली होती.

टी. राजा सिंह यांना हैदराबादमध्ये टायगर राजा सिंह या नावाने ओळखले जातात. राजा सिंह हे २०१४, २०१८ आणि २०२३ असे सलग तीन वेळा हैदराबाद शहरातील गोशामहल विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. गोशामहल विधानसभा मतदारसंघ ओवेसींच्या एमआयएमचं वर्चस्व असलेल्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघात येतो. मात्र गोशामहल भागात राजा सिंह यांनी आपलं वर्चस्व राखलेले आहे. अगदी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजपाचे बहुतांश उमेदवार पराभूत झाले होते, तेव्हाही राजा सिंह मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

राजा सिंह यांची कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळख आहे. तसेच गोरक्षण आणि हिंदू समाजाच्या ऐक्यावर ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतात. राजा सिंह हे बजरंग दल आणि श्रीराम युवा सेना या हिंदुत्ववादी संघटनांशी जोडलेले आहेत. आता भाजपाने राजीनामा स्वीकारल्यानंतर राजा सिंह यांनी पुढील वाटचाल कशी राहील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वार्ताहर प्रशांत माने सर 

Post Views: 20
Previous Post

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

Next Post

हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के

हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के

ताज्या बातम्या

बारावीच्या पेपरला जाताना लोकल मधून पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू.#public #mumbai #viral #public #12th

February 11, 2026

हेडिंग मुंबईत ४४ वर्षानंतर भाजपाचा महापौर #भाजपा #bjp #tranding #popular #viral #public #news

February 11, 2026

निवडणुकीत राम सातपुतेच्या हत्येचा कट? #public #solapurnews #viral #marathinews

February 11, 2026

मुंबई च्या काळबादेवीतून तब्बल १० कोटी रुपयांचे सोने जप्त.#public #marathinews #solapurnews #viral

February 11, 2026

दरवर्षी सोलापूरकर भरतात नो पार्किंगचा एक कोटी दंड.#solapurnews #public #mh13 #mh13newssolapur

February 11, 2026

‘रिसेंट ट्रेंड्स इन अकाउंटिंग, टॅक्सेशन अँड बँकिंग’ विषयावर एक दिवसीय परिषद

February 11, 2026

डब्ल्यू.आय.टीची भरीव झेप; गुरुत्वाकर्षणावर आधारित अभिनव सौरऊर्जा तंत्रज्ञानाकडे

February 11, 2026

शारीरिक आव्हानांवर मात करत ‘लीफ आर्ट’मध्ये नाव कमावणाऱ्या महेश मस्के यांचा विशेष गौरव

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0674514

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697