Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बसवेश्वर स्मारकासाठी कृष्ण तलावाच्या जागेवरच शिक्कामोर्तब

स्मारक कृती समिती अध्यक्षांच्या प्रयत्नाचे फलित

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 17, 2025
in solapur
0
बसवेश्वर स्मारकासाठी कृष्ण तलावाच्या जागेवरच शिक्कामोर्तब
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज/ प्रशांत माने : थोर समतावादी संत आणि लोकशाही संकल्पनेचे प्रणेते जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक मंगळवेढ्यात निर्मितीसाठी राज्य सरकारने हालचाली गतिमान केल्या आहेत.त्याचाच एक भाग म्हणून डाॅ.बसवराज बगले यांच्या नेतृत्वाखालील स्मारक कृती समितीने मागणी केलेली कृष्ण तलावाची शासकीय जमीन वर्ग करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला.
राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विधानभवनात तातडीची बैठक  बोलावून या विषयी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. बाराशे वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात तब्बल 32 वर्षे वास्तव्य करून लोकशाही मुल्यांची मुहूर्तमेढ केलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे ही कर्नाटक – महाराष्ट्रासह देशभरातील बसवप्रेमी आणि लिंगायत समाजाची मागणी आहे.
2016 साली शिवा संघटनेचे नेते प्रा.मनोहर धोंडे आणि तत्कालीन सोलापूर जिल्हा अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले यांनी निवेदनाद्वारे या आंतरराष्ट्रीय स्मारकाची मागणी केली होती.त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक निर्मितीची घोषणा करून त्यासाठी शासकीय समिती गठीत केली होती.त्या समितीने कृषी विभागाच्या जमिनीत कृषी पर्यटन केंद्र उभारून त्या अंतर्गत जागेत बसवेश्वरांचे स्मारक करण्याचा चुकीचा निर्णय घेतला होता.परंतु ती जागा उपलब्ध होणार नसल्याने कृष्ण तलाव परिसरात स्मारकासाठी स्वतंत्र जागेचा आग्रह धरण्यात आला होता.
सात दिवसात जागेचा प्रस्ताव दाखल…!
 दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शिफारसीनुसार डाॅ.बसवराज बगले यांची शासकीय स्मारक समितीवर निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी यांना भेटून शासकीय जमीन स्मारक समितीच्या नांवे हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची विनंती त्यांनी २३ मार्च २०२२ रोजी पत्राद्वारे केली होती.त्यानुसार निवृत्त मंडल अधिकारी आणि समितीचे सदस्य तुकाराम कुदळे यांच्या मदतीने मंगळवेढ्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी बसवेश्वर स्मारकासाठी कृष्ण तलावाचीच जागा योग्य असल्याचा विहित नमुन्यातील प्रस्ताव सातव्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.मात्र काँग्रेसमधील एका समाजद्रोहीने राजकीय द्वेषातून तक्रार केल्यानंतर सदरची समिती एका महिन्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रद्द केली. त्यामुळे स्मारकाच्या कार्याला ब्रेक लागला.
आंदोलनाचा इशारा आणि पाठपुरावा….!
दरम्यान पुन्हा महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या वतीने बसवजयंती दिनापासून आमरण अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा डाॅ.बगले यांनी केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भातील हालचालींना गती आली आहे.
लिंगायत नेते आमदार डाॅ.विनय कोरे,आमदार दिलीप सोपल,आमदार समाधान आवताडे,आमदार अभिजित पाटील,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले,कार्याध्यक्ष शिवानंद पाटील आणि सिध्देश्वर कोरे,शुभम लिगाडे,संजय पाटील,आदिंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे स्मारकाबाबत सतत पाठपुरावा केला आणि विधानसभेत लक्षवेधी करण्यात आली.त्यामुळेच या स्मारकाविषयी प्रशासन गतिमान झाले आहे. तातडीची बैठक घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत आढावा घेतला आणि स्मारक कृती समितीने सुचविलेली कृष्ण तलावाची शासकीय जमीन वर्ग करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची सूचना केली आहे.या आढावा बैठकीला फक्त भाजपच्या काही आमदारांना आणि अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
अन्यथा गंभीर परिणाम..!
भाजपच्या नेतृत्वाने सताधारी राष्ट्रवादी,शिवसेना तसेच लिंगायत समाजातील प्रमुखांना विश्वासात न घेता केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालविला आहे असा आरोप लिंगायत समाज बांधवांनी केला आहे.सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि समाज बांधवांची व्यापक बैठक घेऊन स्मारकाची निर्मिती होणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा हा विषय प्रलंबित राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील अशी चर्चा राज्यभरातील बसवप्रेमींकडून ऐकावयास मिळत आहे.
Post Views: 70
Previous Post

15 हजार फुटांवर यशस्वी चाचणी! ‘आकाश प्राइम’च्या बळावर भारताचं एअर डिफेन्स नेटवर्क आणखी मजबूत

Next Post

डबल मर्डर प्रकरणी दोन आरोपींना उच्च न्यायालयात जामीन मंजूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
डबल मर्डर प्रकरणी दोन आरोपींना उच्च न्यायालयात जामीन मंजूर

डबल मर्डर प्रकरणी दोन आरोपींना उच्च न्यायालयात जामीन मंजूर

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1011022

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!