Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापुरात आस्था फाऊंडेशनकडून नागपंचमीनिमित्त अनाथ ,वृद्ध महिलांना सौंदर्य साहित्याचे वाटप

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
in maharashtra, india, social, solapur
0
सोलापुरात आस्था फाऊंडेशनकडून नागपंचमीनिमित्त अनाथ ,वृद्ध महिलांना सौंदर्य साहित्याचे वाटप
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : हिंदू संस्कृतीतील श्रावण महिना हा भक्तिभाव, व्रते-वैकल्ये व सण-उत्सवांचा असतो. यामध्ये नागपंचमी हा महिलांचा विशेष सण असतो. या सणात मेंदी, नेलपेंट आणि पारंपरिक शृंगार यांना विशेष महत्त्व असते. परंतु समाजात अजूनही एक असा वर्ग आहे, जो या आनंदापासून वंचित आहे त्या अनाथ, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा दुर्लक्षित महिलांना नागपंचमीनिमित्त सौंदर्य साहित्याचे वाटप करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आस्था फाऊंडेशनच्यावतीने यंदा नागपंचमी एक सामाजिक बांधिलकीचा सण ठरला. एम्प्लॉयमेंट चौकातील ‘मंगलदृष्टी’ या संस्थेत राहणाऱ्या वृद्ध, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिलांना नेलपेंट, मेंदी, टिकल्या, कंगवे, केसांचे क्लिप्स, सुगंधी साबण, हात रुमाल, मोत्याचे माळ, कानातले रिंगा व पॉंड्स पावडर यांचा सुंदर गिफ्ट बॉक्स देण्यात आला.
उमा (बिहार), सरस्वती आजी (आंध्रप्रदेश) आणि वंदना (सोलापूर) या महिलांनी या सौंदर्य साहित्याचा आनंद लुटताना डोळ्यांतून आनंदाश्रू ढाळले. उपस्थित महिलांबरोबर फेर धरून गाणी गायली, गोडधोड खाऊ वाटला गेला. काही महिलांना स्वयंसेविकांनी प्रेमाने मेंदी लावली, नखांवर नेलपेंट लावले आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य उपस्थित प्रत्येकाच्या मनात घर करून गेले.
सोलापूर मधील  संस्कार आश्रम, वासल्य निराधार आश्रम, आधार निराधार आश्रम, मंगलदृष्टी निराधार आश्रम, कुष्ठरोग वसाहत, बेघर निवारा केंद्र, तसेच झोपडपट्ट्यांमधील निराधार महिलांसह हा उत्सव साजरा करण्यात करण्यात आला. तसेच अनाथ आश्रमातील बालिकांसाठीही सौंदर्य साहित्याचे वाटप करण्यात आले. मुलींनी नृत्य-सादरीकरण करत, गाणी म्हणत सणाचा आनंद द्विगुणित केला.
या प्रसंगी नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, संपदा जोशी, सविता जोशी, अनिता तालीकोटी, सुरेखा पाटील, विजयालक्ष्मी सिरसी, सविता उपाध्ये, शारदा जोशी, शैला दिडवणीय, स्वामी चराटे मॅडम  आणि गवळी ताई, राधा वहिनी, प्रकाश डांगरे, पुष्कर पुकाळे, अविनाश मार्चल ,विजय छंचुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 43
Previous Post

नागपंचमीच्या पूर्वसंध्येला सर्पदंशाच्या ४ घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

Next Post

नवीन विद्युत मीटरचा प्रश्न गंभीर! शेतकऱ्याने महावितरण कार्यालयासमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नवीन विद्युत मीटरचा प्रश्न गंभीर! शेतकऱ्याने महावितरण कार्यालयासमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

नवीन विद्युत मीटरचा प्रश्न गंभीर! शेतकऱ्याने महावितरण कार्यालयासमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आस्था सामाजिक संस्थेस सावित्री रत्न पुरस्कार देऊन गौरव

June 30, 2026
विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

June 30, 2026

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी

June 30, 2026

१ ते ९ जुलैदरम्यान शहरात विशेष स्वच्छता मोहीम

June 30, 2026

शिक्षण विभागात प्रशासकीय फेरबदल; माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी शाखेची जबाबदारी भरत कारसले यांच्याकडे

June 30, 2026

एन. एच .एम.कर्मचाऱ्यांना अखेर न्याय! १० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा

June 30, 2026
टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

June 30, 2026
प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0950453

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697