तभा फ्लॅश न्यूज : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे मात्र काही महाभाग या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून समाजातील प्रतिष्ठित लोकांची विशेषतः सेलिब्रेटींची बदनामी करत आहे. सध्या फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया साईटवर सेलिब्रिटींचे त्यातही हिंदी आणि मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्रींचे मॉर्फ केलेल्या अश्लील छायाचित्रांचा आणि व्हिडिओचा पूर आला आहे.
छायाचित्र आणि व्हिडिओ एडिटिंग करताना एआय या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. एआयच्या मदतीने व्हिडिओ आणि फोटो एडिट करून लोकांना त्रास दिला जातो. तंत्रज्ञानाने मानवी जीवनात क्रांती केली आहे. विज्ञानाच्या मदतीने दररोज नवे तंत्रज्ञान उदयास येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी केला पाहिजे.
विज्ञान तंत्रज्ञानाचा हेतू मानवी कल्याण हेच आहे मात्र काही नतद्रष्ट लोक या तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणासाठी नाही तर समाज विघातक कार्यासाठी करतात हा प्रकार त्यातलाच आहे. वास्तविक कोणाचाही फेक व्हिडिओ किंवा छायाचित्र बनवून बदनामी करणे हा गुन्हा आहे. अशा समाज विघातक लोकांना कायद्याने कडक शिक्षा व्हायलाच हवी. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग ही नवीच समस्या आता निर्माण झाली आहे.
Post Views: 54