Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपन संपन्न

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2025
in india, international, maharashtra, solapur
0
स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपन संपन्न
0
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा फ्लॅश न्यूज : संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्यविधाते, राजकारणाबरोबरच समाजकारण, सहकार, शिक्षण, शेती व पाणी या क्षेत्रात भरीव कामगिरी करून महाराष्ट्रातील लोकमानसावर ठसा उठवणारे, राजकारणात दंतकथा ठरलेले असे विश्वविक्रमी नेतृत्व, संपूर्ण आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षातच राहून पक्ष आणि जनतेशी इमानदारी व बांधिलकी जपुन अनेक पक्षीय प्रलोभनाला बळी न पडता ध्रुवताऱ्याप्रमाणे अचल राहणारे, महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांची जाण व भान असणारे, शेतकरी कामगार पक्षाची ओळख जगभर करून देणारे नेतृत्व, शेतकरी, शेतमजुर आणि कामगारांसाठी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी व्यतीत करणारे, सांगोला तालुक्याचे दैवत व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला चे संस्थापक अध्यक्ष स्व.आम.डॉ. गणपतराव देशमुख यांची जयंती मोठ्या उत्साहात न्यू इंग्लिश स्कूल सांगोलाच्या कॅम्पस मध्ये संपन्न झाली.

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, सांगोला या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

सदर प्रतिमा पूजन व वृक्षारोपन कार्यक्रम श्रीमती रतनाबाई गणपतराव देशमुख, सौ. सुरेखाताई चंद्रकांत देशमुख, संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख, डॉ.सौ.आस्था अनिकेत देशमुख, संस्थेचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे सर, संस्था सदस्य प्रा, अशोकराव शिंदे, प्रा दीपक खटकाळे, प्रा जयंत जानकर व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे प्राचार्य प्रा. केशव माने व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे प्राचार्य श्री. दिनेश शिंदे सर, उपप्राचार्य प्रा संतोष जाधव, पर्यवेक्षक श्री दशरथ जाधव सर, श्री तातोबा इमडे सर, डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अशोक कांबळे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ इंदिरा येडगे व सौ स्मिता इंगोले मॅडम या सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी स्व.आम.डॉ. गणपतराव देशमुख यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजने मार्फत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख व संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर यांच्या शुभहस्ते डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.ज्योतिबा हुरदुके, प्रा संतोष राजगुरू व वृक्षारोपन कमिटीचे चेअरमन प्रा. अक्षय माने तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे प्रा मिलिंद पवार, प्रा दत्तात्रय देशमुख, प्रा अरुण बेहेरे व प्रा जुलेखा मुलाणी यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच एक पेड माँ के नाम या मोहिमे अंतर्गत एन.सी.सी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे.व्ही ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाडाचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले. अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.

Post Views: 30
Previous Post

मालगुडी डेजपासून IT हबपर्यंत : पंतप्रधान मोदींकडून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील

Next Post

स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या ९८ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या ९८ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या ९८ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्या

आस्था सामाजिक संस्थेस सावित्री रत्न पुरस्कार देऊन गौरव

June 30, 2026
विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

June 30, 2026

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी

June 30, 2026

१ ते ९ जुलैदरम्यान शहरात विशेष स्वच्छता मोहीम

June 30, 2026

शिक्षण विभागात प्रशासकीय फेरबदल; माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी शाखेची जबाबदारी भरत कारसले यांच्याकडे

June 30, 2026

एन. एच .एम.कर्मचाऱ्यांना अखेर न्याय! १० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा

June 30, 2026
टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

June 30, 2026
प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0950378

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697