Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबई पालिकेची दहीहंडी फोडणारच; गोपालकालाच्या निमित्याने राजकीय फटाके

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
in maharashtra, mumbai, political, solapur, top news
0
मुंबई पालिकेची दहीहंडी फोडणारच; गोपालकालाच्या निमित्याने राजकीय फटाके
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज/जमीर काझी : मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवाला मोठी राजकीय किनार लाभली आहे. सत्तेची हंडी फोडण्यासाठी नेत्यांची धडपड आणि कार्यकर्त्यांची लगबगीमुळे मुंबई महानगरासह ठाणे, कल्याण नवी मुंबईत लाखोंच्या रक्कमेच्या हंडी लावण्यात आल्या होत्या.दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असताना नेत्यांनी राजकीय फटाकेबाजी करीत कार्यकर्त्यांचा जल्लोष आणखी वाढविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिका निवडणुकीत परिवर्तनाची हंडी फोडणार, असा विश्वास व्यक्त करीत कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर घातली आहे.
भाजपाच्या वतीनं वरळी येथील जांबोरी मैदानात आयोजित परिवर्तन दहीहंडीसह वडाळा, घाटकोपर, बोरिवली येथे भाजपाच्या नेत्यांनी आयोजिलेल्या उत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन गोविदा व कार्यकर्त्याचा उत्साह वाढविला.
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडलेली आहे. आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लावली जाईल. त्या विकासाच्या हंडीतलं लोणी जनसामान्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,” असे सांगून ते म्हणाले,'”इतकी वर्ष लोणी कुठं जात होते, हे जनतेला सगळे माहिती आहे. सण, उत्सवांवरची सगळी बंधनं आधी एकनाथ शिंदे आणि आता मी हटवून टाकली. त्यामुळं गोविंदांचा उत्साह प्रचंड आहे. काल रात्रीपासून मुंबईत जोरदार पाऊस होतोय. पण, गोविंदांच्या उत्साहाचा पाऊस त्यापेक्षा मोठा आहे,” असेही त्यांनी सांगितले.
223 थरांची हंडी फोडली : शिंदे 
 गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने 223 थरांची दहीहंडी फोडली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकामध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माहिती सरकार बाजी मारणार असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या ते बोलत होते. नाव न घेता उद्धव ठाकरे गटावर कटोरी टीका केली.
मुंबई गुजराती माणसाच्या हाती जाऊ देणार नाही : संजय राऊत 
 मुंबईवर कब्जा मिळविण्यासाठी गुजरात व दिल्लीची मंडळी डोळा ठेवून आहेत, मात्र इथला मराठी माणूस ती गुजरात्यांच्या हाती जाऊ देणार नाही, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी भाजपा व शिंदे गटावर निशाणा साधला. उद्धव व राज ठाकरे हे मुंबई, ठाणे,कल्याण डोंबिवली, नाशिक महापालिका एकत्रित लढणार असल्याचा पुनरुचार केला.
सिलिब्रेटी रेलचेल
 दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रसिद्ध चित्रपट अभिनेते,सिनेतारका, आयटम गर्ल या दहीहंडी सोहळ्याच्या उपस्थिताच्या आकर्षणाचा भाग बनले होते. मुंबई, बोरिवली,ठाणे, कल्याण आदी ठिकाणी उत्सवाला अभिनेते सुनील शेट्टी चंकी पांडे, मृणालिनी, गौतमी पाटील आदींनी हजेरी लावीत, तर काहीनी आपल्या नृत्याविष्कार सादर करीत उपस्थिताचा जल्लोष वाढविला.
Post Views: 14
Previous Post

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

Next Post

दयावान ग्रुपच्या दहीहंडीत साकारला वैंकुंठगमन सोहळा!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
दयावान ग्रुपच्या दहीहंडीत साकारला वैंकुंठगमन सोहळा!

दयावान ग्रुपच्या दहीहंडीत साकारला वैंकुंठगमन सोहळा!

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677767

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697