तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : शहरातील मोकाट जनावरांच्या वाढत्या समस्येमुळे सोलापूर महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. या अंतर्गत आता दंडापासून ते जनावरांची कायमस्वरूपी जप्ती करण्यात येणार आहे.
शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गत अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई अधिक तीव्र करण्याचा प्रशासक ठराव मंजूर करण्यात आला आहे. महापालिकेत जनावरे मालक व पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्व जनावरांना इअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले होते. यासाठी मालकांना एका महिन्यापेक्षा अधिक मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्याने महापालिका थेट कारवाई करणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओम्बासे यांनी दिली. जनावरांचे इअर टॅगिंग करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे
इअर टॅगिंग असलेली जनावरे
मोकाट आढळल्यास मोठ्या जनावरांना 10 हजार तर लहान जनावरांना 5 हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. ही जनावरे दुसऱ्यांदा मोकाट आढळल्यास दंड अनुक्रमे 20 हजार व 10 हजार राहणार आहे. अशी जनावरे तिसऱ्यांदा पुन्हा मोकाट आढळल्यास अशी जनावरे कायमस्वरूपी जप्त करून गोशाळेत ठेवण्यात येईल. इअर टॅगिंग नसलेली जनावरे थेट कायमस्वरूपी जप्त करून गोशाळेत ठेवण्यात येणार आहे. यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.
Post Views: 35