Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भारतीय कृषी पद्धती व देशी गोवंशपालनामुळे स्वयंपूर्णता साध्य होईल : डॉ. मोहन भागवत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 23, 2025
in education, india, maharashtra, solapur, top news
0
भारतीय कृषी पद्धती व देशी गोवंशपालनामुळे स्वयंपूर्णता साध्य होईल : डॉ. मोहन भागवत
0
SHARES
68
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  भारतीय शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून तसेच पशुपालनासह मिश्र शेतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि आव्हानांचा विचार करता कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पशुवैद्यक शास्त्रात सर्वोच्च गुण प्राप्त करणारे विद्यार्थी व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही गौरविण्यात आले. तसेच प्रतिष्ठानची स्मरणिका प्रकाशनही यावेळी झाले. या प्रसंगी डॉ. अशोक दिवाण (अध्यक्ष, ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान) व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पशुपालक व पशुवैद्यकीय पदवीधरांना आदर्श पशुपालक, आदर्श गोपालक, उत्कृष्ट पशुवैद्य, आदर्श प्राध्यापक अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

आदर्श पशुपालक पुरस्कार -सौ. वैशाली भाऊसाहेब चव्हाण, देवणी गोवंश आदर्श गोपालक – रामकृष्ण नामदेव दरगुडे, कै. खंडेराव जाधव आदर्श शेळीपालक पुरस्कार – राहुल लक्ष्मण पुऱ्हे, गुणवंत विद्यार्थी – डॉ. कु. ईश्वरी जोशी (तीन पुरस्कार), यशवंत विद्यार्थी सुवर्ण पदक पुरस्कार – डॉ. वैभव विष्णुदास हरडे, गुणवंत विद्यार्थिनी – डॉ. कु. शारदा ढाकरके, आदर्श पशुवैद्य डॉ. अनिल कौसडीकर, पशुवैद्य भूषण डॉ. नरेश गीते, जीवनगौरव पुरस्कार – डॉ अरविंद मुळे, आदर्श प्राध्यापक डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, उत्कृष्ट पशुवैद्य सहदेव पुरस्कार – डॉ. आनंद राजशेखर दडके, उत्कृष्ट पशुवैद्य नकुल पुरस्कार – डॉ. विजय ढोके, उत्कृष्ट पशुवैद्य पुरस्कार– डॉ.प्रमोद रतनलाल दोशी, आदर्श प्राध्यापक डॉ. विश्वंभर पाटोदकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

संस्थेची सुरुवात प्रतिकूल परिस्थितीत झाली. अनेक सहकाऱ्यांच्या योगदानामुळे आज संस्थेची क्षमता वाढली असून विविध पुरस्कार प्रदान करण्याइतपत कामकाज विस्तारले आहे, असे अध्यक्षांनी सांगितले.

डॉ. भागवत पुढे म्हणाले, ज्याला बोलता येत नाही, उपचार करताना जो विरोध करतो, त्याचेही दुःख समजून त्याला बरे करण्याची कला आपल्याकडे आहे. शालिहोत्र या प्राचीन पशुवैद्याने घोड्याचे वय व गुणवत्तेचे शास्त्र सांगितले होते. आपली ही परंपरा अभिमानास्पद आहे. शेतीत पाश्चात्त्य तंत्रज्ञान व आधुनिकता आवश्यक तिथे स्वीकारून, भारतीय पद्धतीनुसार शेती व पशुपालनाचा समन्वय साधला तर शेतकऱ्याला लाभ होईल. देशी गोवंश व पारंपरिक शेती पद्धतीबाबत लोकांचा विश्वास वाढत आहे. भारतीय शेतीची आधुनिक रूपे विकसित करूनच आपण कृषी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू शकतो.

 

Post Views: 65
Previous Post

सोलापुरात डाॅल्बी मुक्त उत्सव,जयंती साजऱ्या होणार! ध्वनी प्रदुषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल?

Next Post

पारधमध्ये दोन गटांत तुफान राडा; पोलीस ठाण्यात  गुन्हे दाखल! 

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पुणे हादरले! चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या तरूणाची मंगला चित्रपटगृहा बाहेर तलवारीने वार करून हत्या

पारधमध्ये दोन गटांत तुफान राडा; पोलीस ठाण्यात  गुन्हे दाखल! 

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीच्या अध्यक्षपदी रो. नरसिम्हा कनकी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीच्या अध्यक्षपदी रो. नरसिम्हा कनकी यांची निवड

June 30, 2026

शेतीशी आणि मातीशी असलेले नाते जपणारा पारंपरिक कारहुणवी सण उत्साहात साजरा

June 30, 2026

डॉक्टर डे निमित्त डॉ. सतीश कोपूरवाड यांना विशेष सन्मान

June 30, 2026
नशा सोडा, जीवन जोडा” : नशामुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत पोलीस मित्र–विद्यार्थी संवाद 

नशा सोडा, जीवन जोडा” : नशामुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत पोलीस मित्र–विद्यार्थी संवाद 

June 30, 2026
सोलापूर पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश! शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

सोलापूर पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश! शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

June 30, 2026

विकसित भारत २०४७च्या दृष्टीने अक्कलकोट पर्यटनावर संशोधन

June 30, 2026

डाळिंब फुलांचा शब्दोत्सव २०२६ अंतर्गत सांगोल्यात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 

June 30, 2026
धाराशिव येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप 

धाराशिव येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप 

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0950048

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697