Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी आमूलाग्र बदल घडवणारे ठरेल – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

तरुण भारतbyतरुण भारत
October 15, 2025
in india
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्‍ली – केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की विशाखापट्टणममधील गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी एक परिवर्तनकारी पाऊल आहे.  आगामी इंडिया एआय शिखर परिषदेपूर्वी गुगलने आयोजित केलेल्या भारत एआय शक्ती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. वैष्णव  म्हणाले, “गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी एका नवीन युगाची सुरुवात करत आहे. ही पायाभूत सुविधा एआय-फर्स्ट डेटा सेंटर आर्किटेक्चरच्या क्षेत्रात नवीन आयाम स्थापन  करते, जे नवीन सबसी केबल नेटवर्क्समधील गुंतवणूकीवर आधारित आहे आणि स्वच्छ ऊर्जेद्वारे संचालित आहे.  हे केवळ एआय-चालित सेवांच्या नवीन युगाला गती  देणार नाही तर देशभरात उच्च-मूल्य असलेल्या नोकऱ्या आणि आर्थिक संधी निर्माण करेल. ही भागीदारी भारतात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणत आहे हे पाहून आम्हाला अभिमान वाटतो असे सांगत इंडिया एआय मिशनच्या उद्दिष्टांना पुढे नेण्यात हबची भूमिका त्यांनी अधोरेखित केली . “ही डिजिटल पायाभूत सुविधा आमच्या इंडिया एआय मिशनची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मोठे योगदान देईल ,” असे ते  म्हणाले.

भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत एआय सेवा हे  एक प्रमुख उदयोन्मुख क्षेत्र असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी अधोरेखित केले आणि प्रतिभा आणि रोजगार निर्मितीसाठी या सुविधेचा लाभ  घेण्याचे आवाहन त्यांनी गुगलला केले. इंडिया एआय मिशन अंतर्गत कॉमन कॉम्प्युट इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग म्हणून एनव्हीडियाच्या जीपीयू (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) शी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी गुगलच्या टीपीयू (टेन्सर प्रोसेसिंग युनिट) चे स्वागत केले. एआय हब हे इंडिया एआय मिशनच्या उद्दिष्टांना लक्षणीयरीत्या गती देईल  यावरही त्यांनी भर दिला, तसेच जलद गतीने होत असलेल्या एआय-चालित बदलांच्या पार्श्वभूमीवर  आयटी व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात नवीन कौशल्ये शिकवण्याची आणि कौशल्य वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.  त्यांनी गुगलला या प्रयत्नात  उद्योगाला पाठिंबा देण्याचे आवाहन  केले.

समुद्राखालील केबल कनेक्टिव्हिटीचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले  की, “अंदमान आणि निकोबार बेटे सामरिकदृष्ट्या मोक्याच्या जागी स्थित आहेत. सिंगापूर आधीच मोठ्या ओझ्याखाली दबले आहे. आपण अंदमानला जागतिक इंटरनेट डेटा स्थानांतरणासाठी  पुढील प्रमुख केंद्र का बनवू शकत नाही? भारत सरकारच्या दृष्टिकोनातून, आम्ही या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा देऊ. अंदमान बेटे गुगल आणि इतर इंटरनेट-आधारित संस्थांना आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया आणि नवीन डेटा क्षमता शोधत असलेल्या इतर प्रदेशांशी जोडण्यास मदत करू शकतात, जे नवीन डेटा क्षमतेच्या शोधात आहेत. “


ईशान्येकडील राज्यात डिजिटल कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडून विशाखापट्टणम -सिटवे लिंकचा प्रस्ताव

केंद्रीय मंत्र्यांनी ईशान्येकडील राज्यांमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी विशाखापट्टणम -सिटवे (म्यानमार) लिंक स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडला. त्यांनी विद्यमान रेलटेल नेटवर्क विस्तारण्याची गरज अधोरेखित केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री  एन. चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी सांगितले की, “आंध्र प्रदेशातील ही महत्त्वपूर्ण गुंतवणूक भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासातील एक नवीन अध्याय आहे.

गुगल क्लाउडचे मुख्य कार्यकारी अधिकारी  थॉमस कुरियन यांनी अधोरेखित केले की, “विशाखापट्टणममधील गुगल एआय हब हे भारताच्या डिजिटल भविष्यातील एक ऐतिहासिक गुंतवणूक आहे. ही भागीदारी भारत आणि अमेरिकन सरकारांसोबत एआयचा जबाबदारीने वापर करण्यासाठी आणि समाजासाठी परिवर्तनात्मक प्रभाव पाडण्याप्रति  आमची सामायिक वचनबद्धता दर्शवते.”

गुगल एआय हब: एआय परिवर्तनाला गती

गुगलने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (वायझॅग) येथे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) हब स्थापन करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे कंपनी संपूर्ण भारतात एआय-चालित परिवर्तनाला गती देण्याच्या उद्देशाने त्यांचे संपूर्ण एआय स्टॅक तैनात करू शकेल. नवीन एआय हब प्रगत एआय पायाभूत सुविधा, डेटा सेंटर क्षमता, मोठ्या प्रमाणात नवीकरणीय ऊर्जा स्रोत आणि विस्तारित फायबर-ऑप्टिक नेटवर्क हे सर्व एकाच ठिकाणी एकत्र आणेल.

पाच वर्षांमध्ये (2026–2030) अंदाजे 15 अब्ज अमेरिकन डॉलर्सची ही गुंतवणूक गुगलची भारतातील आजपर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे आणि भारत सरकारच्या विकसित भारत दृष्टिकोनाला अनुरूप आहे, जे एआय-चालित सेवांच्या विस्ताराला गती देण्याचा प्रयत्न करते.

कार्यान्वित झाल्यावर, नवीन डेटा सेंटर संकुल 12 देशांमध्ये विस्तारलेल्या  गुगलच्या विद्यमान एआय डेटा सेंटरच्या नेटवर्कमध्ये सामील होईल. बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे येथील गुगलच्या संशोधन आणि विकास केंद्रांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा त्याला फायदा होईल, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर नवोन्मेषांची रचना  आणि विकास समाविष्ट आहे. 

नवीन आंतरराष्ट्रीय सबसी गेटवेची निर्मिती

गुगलच्या एआय हब गुंतवणुकीत एक नवीन आंतरराष्ट्रीय सबसी गेटवे बांधणे समाविष्ट आहे, ज्यामध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील विशाखापट्टणमपर्यंत पोहचण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सबसी केबल्सचा समावेश आहे – ज्या गुगलच्या दोन दशलक्ष मैलांपेक्षा जास्त विद्यमान स्थलीय आणि सबसी केबल्सशी जोडल्या जातील. यामुळे विशाखापट्टणम हे एआय आणि कनेक्टिव्हिटी हब म्हणून स्थापित होईल जे केवळ भारतालाच नव्हे तर उर्वरित जगाला सेवा पुरवेल.

Post Views: 19
Previous Post

कॉलेज कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी करावे, राज्य शासनाकडे मागणी

Next Post

कामगार सुधारणा, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा प्रोत्साहन प्रयत्नांचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले कौतुक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कामगार सुधारणा, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा प्रोत्साहन प्रयत्नांचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले कौतुक

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींना मिळणार एकदम ६००० रुपये..#लाडकी_बहीण_योजना #ladkibahin

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान#public #trendingshorts

February 13, 2026

पुण्यातील रिक्षा चालकासह सोलापुरातील विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे.. #crime #viral #aajsolapur

February 13, 2026

तुकाराम मुंढेनी केले ९०० दिव्यांग संस्था नोंदणी रद्द.. #viral #public #handicapped

February 13, 2026

शासकीय रुग्णालयातील उपचार निशुल्कच..#public #solapurnews #marathinews #viral

February 13, 2026

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात कारचालक जागीच ठार..#public #viral #acsident

February 13, 2026

पुण्यातील रिक्षा चालकासह सोलापुरातील विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे.#public #solapurnews #crime

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान.#india #france #public #viral

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0678134

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697