अक्कलकोट – शुक्रवार १७ पासून अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अक्कलकोट, मैंदर्गी,दुधनी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबु यांनी दिली.
देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार, राज्याचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह दादा मोहिते पाटील, खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, सोलापूर चे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख व कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार इच्छुकांची अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.तरी इच्छुक उमेदारांनी अक्कलकोट, मैदर्गी व दुधनी नगर परिषद येथील आपले नाव, मोबाईल नंबर,वार्ड क्रमांक तसेच ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समिती गट नावासहित अक्कलकोट येथील प्रियदर्शनी मंगल कार्यालय जवळील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन शहर अध्यक्ष सौरभ लांडगे यांनी केला आहे.
यावेळी अक्कलकोट शहर युवक अध्यक्ष सौरभ लांडगे, ओबीसी तालुका अध्यक्ष स्वामीराव पोतदार, अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष सिद्धाराम पोतदार, तालुका उपाध्यक्ष दरेप्पा अरवत सरचिटणीस श्रीनिवास सिंदगीकर, तालुका उपाध्यक्ष बसवराज देशमुख, बसवराज देशमुख, समीर शेख, गणेश कांबळे, मोसीन बागवान, निहाल चुंगीवाले, एजाज राणा, समीर, सैपन फुलारी इत्यादी उपस्थित होते.


















