श्रीपूर – समाजा मध्ये अनेक जण आपले दुःख बाजूला सारून इतरांच्या अडी अडचीत मदत करणारे दिसून येतात . त्यापैकीच श्रीपूर येथिल मोहीत मिलिंद कुलकर्णी या दिव्यांग विद्यार्थ्यान आपल्याला मिळत असलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम मुख्यमंत्री पुरग्रस्त सहाय्य निधीस देवून पुरग्रस्ताचे आश्रु पुसण्याचा प्रयत्न केला . मोहीत हा जन्मतःच अपंग असून सुरुवातीस त्यांची दृष्ट्री चांगली होती परंतू डोक्याचे ऑपरेशन वेळी त्याची द्रष्ट्री कमी होत गेली अशा ही परिस्थितीत त्याने आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले . दिव्यांग असल्याने त्याला शिष्यवृत्ती मिळत आहे .
श्रीपूर मध्ये बुधवार दि . १५ ऑक्टों . ला कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येणार आहेत म्हटल्यावर मोहितने आई – वडिलांकडे पुरग्रस्तांसाठी आपण माझ्या शिष्यवृत्तीचा निधी मुख्यमंत्री पुरग्रस्त सहाय्य निधीस देवूयात असा विषय मांडला . वडिल मिलिंद व आई कल्पना मोहीतला कार्यक्रम स्थळी घेवून गेले . परंतू कडक सुरक्षा यंत्रणे मुळे ते मुख्यमंत्र्या पर्यंत पोहोचू शकले नाहीत . त्यामुळे या कुटूंबाने हा निधी पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांचे कडे सुपूर्त केला .
मोहीतचे हे कृत्य पाहून प्रशांतराव परिचारक , कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी तसेच तेथे उपस्थित असलेले शेतकरी सभासद व सद्गदीत झाले . व त्यांनी मोहीतच्या संवेदनशीलते बद्दल कौतुक केले व म्हणाले मी मुंबईला जावून हा पुरग्रस्ता साठी दिलेला चेक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे सुपूर्त करून आपल्या कुटुंबाच्या भावना पोहोचवतो . मोहितच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे .


















