Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समाजातील प्रत्येक वंचित व्यक्तीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण भारतbyतरुण भारत
October 21, 2025
in maharashtra
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर  – सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक व्यापक विचार आम्ही बाळगला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकातील माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जी दूरदृष्टी बाळगली ती प्रत्यक्षात आम्ही समाजातील विविध घटकांना प्रत्ययास देत आहोत. त्यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून सामाजिक न्याय विभागाचा हा विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ पोहचविण्याचा उपक्रम याचेच द्योतक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दिवंगत ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या समारंभात ते बोलत होते. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने ई-रिक्षा व इतर वैयक्तिक लाभ योजना वाटप समारंभास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहनिर्माण तथा इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, सर्वश्री आमदार कृपाल तुमाने, परिणय फुके, डॉ. आशिष देशमुख, मोहन मते, चरणसिंग ठाकुर, संजय मेश्राम, राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वंचित घटकांना स्वंयरोजगाराची साधने मिळण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्नरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महिलांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली आहे. राज्यात आपण २५ लाख दीदींना लखपती केले आहे. आजच्या घडीला राज्यात सुमारे ५० लाख दीदी आता लखपती दीदी झाल्या आहेत. लवकरच १ कोटी दीदींना लखपती करण्याचा संकल्प आपण पूर्ण करू असा, विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी व्यक्तीला ऊर्जा दाता करण्याची नाविन्यपूर्ण योजना राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मांडली. यानुसार नाविन्यपूर्ण योजनेतून प्रत्येक आदिवासी घरावर सौरऊर्जा देण्याचे नियोजन झाले. या योजनेतील उपयोगीता लक्षात घेवून लवकरच अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग घटकातील उपेक्षित लोकांनाही या योजनेचा लाभ पोहचू असे, सुतोवाच त्यांनी केले.

जिल्ह्यातील १ हजार महिला बचत गटांना व्यवसायासाठी प्रतीगट १ लाख रूपयांचा निधी – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अधिकाअधिक महिलांना आपल्या व्यवसायाला आकार देता यावा, त्यांच्या व्यावसायीक कल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार महिला बचत गटांना प्रती गट १ लाख रूपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देऊ असे, प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकंमत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेंतर्गत सुमारे २० कोटी रूपयांचा निधी सामाजिक न्यायासाठी, वंचित घटकातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून आपण उपयोगात घेतला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजनानांही आपण अधिक गती देऊ असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी आपण कल्पक करणार आहोत. प्रत्येक गावापातळीवर शासनाच्या विविध विकास योजना प्रभावीपणे व पारदर्शकपणे पोहचाव्यात यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाला जोडण्यासाठी एक परीपूर्ण वॉररूम साकारली जात असून याद्वारे आरोग्याच्या अधिक परिणामकारक सुविधा पोहोचवील्या जाणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी लवकरच दिव्यांग बांधवांनसाठी अधिक प्रभावीपणे शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली असून प्रत्येक  जिल्हा वार्षिक योजनेतून यासाठी ठराविक रक्कम देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करू, असे सांगितले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाने निर्मिती केलेल्या रमाई घरकुल योजनेच्या लघुपटाचे याचबरोबर ‘स्वप्न ते सत्य’ कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले. कामठी तालुक्यातील वारेगाव शाळेतील अॅडव्हेंचर पार्कचे दुरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन या समांरभात करण्यात आले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात ६ लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शेत जमिनीचे कागदपत्र वाटप करण्यात आले. एकूण ४९ एकर २३ लाभार्थ्यांना देण्यात आली.  घर घर संविधान अंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रस्ताविका देण्यात आल्या. जिल्हा परिषद, नागपूर व महानगरपालिका, नागपूर अंतर्गत आशा व अंगणवाडी सेविकांना सायकलींचे वितरण करण्यात आले. विशेषत: दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एकूण ७५५ ई-रिक्षा वितरित करण्यात आल्या. यातील २०० ई-रिक्षा पहिल्या टप्प्यात तर ५५५ ई-रिक्षा आजच्या दुसऱ्या टप्प्यात वितरित करण्यात आल्या. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना कार्यालयीन सुविधेसाठी एकूण ६ हजार ३३४ सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले.

Post Views: 62
Previous Post

रेल्वे, माहिती प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल्वे बोर्डाच्या वॉर रूमला भेट

Next Post

५० वे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन आणि परीक्षण, दिवाळी अंक संपादक – प्रकाशकांना आवाहन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

५० वे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन आणि परीक्षण, दिवाळी अंक संपादक - प्रकाशकांना आवाहन

ताज्या बातम्या

उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?

उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?

April 11, 2026
दिवसा अवकाशात दिसणारे तारे पाहून विद्यार्थी झाले अचंबित

दिवसा अवकाशात दिसणारे तारे पाहून विद्यार्थी झाले अचंबित

April 11, 2026
भालकेंच्या शिवसेना पक्ष प्रवेशा अगोदरच तीर्थक्षेत्र  विकास आघाडीच्या नगरसेवकांची पालिकेत वेगळी चुल

भालकेंच्या शिवसेना पक्ष प्रवेशा अगोदरच तीर्थक्षेत्र  विकास आघाडीच्या नगरसेवकांची पालिकेत वेगळी चुल

April 11, 2026
आगामी सण, उत्सव, जयंती शांततेत साजरे होण्यासाठी शहर पोलिसांचा रूट मार्च

आगामी सण, उत्सव, जयंती शांततेत साजरे होण्यासाठी शहर पोलिसांचा रूट मार्च

April 11, 2026
संतविचारांनी जगा, ज्ञानाने अज्ञान नष्ट होते ;पांडुरंग कृपेचा अधिकारी बना

संतविचारांनी जगा, ज्ञानाने अज्ञान नष्ट होते ;पांडुरंग कृपेचा अधिकारी बना

April 11, 2026
अकलूज नगर परिषदेत महत्त्वाचे निर्णय : प्रत्येक प्रभागात दोन हायमास्ट दिवे, रस्ते विकासाला गती

अकलूज नगर परिषदेत महत्त्वाचे निर्णय : प्रत्येक प्रभागात दोन हायमास्ट दिवे, रस्ते विकासाला गती

April 11, 2026
करूणा शर्मा, बिचुकलेंसह सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल-हेमंत पाटील

करूणा शर्मा, बिचुकलेंसह सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल-हेमंत पाटील

April 11, 2026
इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग:  रॉयल्स, गुलमोहर के.के. संघ उपांत्य फेरीत 

इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग:  रॉयल्स, गुलमोहर के.के. संघ उपांत्य फेरीत 

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0801652

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697