मंगळवेढा – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवेढ्यात येऊन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे व खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे त्यांच्या कार्यालयास भेट दिली आहे.
आज सिध्देश्वर आवताडे यांचा वाढदिवस असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवताडे यांचा सत्कार केला.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे, सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, तालुका प्रमुख आबासाहेब लांडे, शहर प्रमुख प्रतीक किल्लेदार, स्वप्नील निकम आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या भेटी मध्ये येत्या तीन चार दिवसात बबनराव आवताडे गटाचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच दिवसापासून प्रवेश होणार होता अशी चर्चा रंगली होती.
यावेळी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी आवताडे यांचा प्रवेश घ्यायचा आहे त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले तीन चार दिवसात प्रवेश करून घेऊ असे आश्वासन यावेळी दिले.
दरम्यान, आमदार समाधान आवताडे यांनी दामाजी चौकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले दामाजी पुतळ्यास एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून शिंदे यांचा ताफा बबनराव आवताडे यांच्या कार्यालयाकडे गेला.



















