सोलापूर – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने येत्या फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केली आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.
दोन्ही परीक्षा १९ मार्च रोजी संपतील. प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारीपासून सुरू होतील. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रक माहितीसाठी आहे, परीक्षेपूर्वी शाळा महाविद्यालयांकडे दिले जाणारे छापील वेळापत्रकच अंतिम असेल, अन्य समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे राज्य शिक्षण मंडळांने कळविले आहे.

















