सोलापूर – शिवसेना (ठाकरे गट) चे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे लवकर बरे व्हावेत तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोलापूर शहरातील रूपाभवानी मंदिरात विशेष आरती करण्यात आली. आरतीनंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या वेळी बोलताना सुरेश जगताप यांनी सांगितले की, “खासदार संजय राऊत हे लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा जोमाने राजकारणात सक्रिय होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजय राऊत यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी शिवसेना शहरसंघटक सुरेश जगताप, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, शहर समन्वयक निरंजन बोदुल, महिला आघाडी शहर संघटक स्वाती रूपनर, शहर उपसंघटक मीनाक्षी गवळी, उपशहर प्रमुख दत्ता खलाटे, सोमनाथ शिंदे, दीपक दळवी, विभाग प्रमुख आबा सावंत, महेश गवळी, अण्णा गवळी, रिक्षा सेना शहर संघटक बाळासाहेब पवार, शाखाप्रमुख राहुल परदेशी, मारुती खानापुरे, लालसिंग राठोड, गणेश शिंदे, विराट रूपनर आदी
उपस्थित होते.


















