सोलापूर – जिल्हा परिषद कृषी विभागाच्या डीबीटी योजनेतील पन्नास टक्केच लाभार्थ्यांनी कृषिपूरक साहित्य खरेदी केले आहेत. शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील शेतकर्यांना संधी मिळणार आहे.
कृषी विभागाने विविध प्रकारच्या तेरा कृषिपूरक औजारांसाठी ऑगस्ट महिन्यांत लॉटरी काढली होती. त्यावेळी दोन हजार ४५९ शेतकऱ्यांना शेतीपूरक औजारांची लॉटरी लागली. त्यातील एक हजार २५९ शेतकऱ्यांनी साहित्य खरेदी केले. त्यामुळे कृषिपूरक औजारे खरेदीचा कल कमी झाल्याचे दिसत आहे.
कृषी विभागाकडील डीबीटी योजनेसाठी २१ हजारापेक्षा जास्त अर्ज विविध तालुक्यातून आले होते. त्यातील दोन हजार ४५९ लाभार्थ्यांना शेतीपूरक औजारे लाॅटरी पद्धतीने लागली होती. त्यातील १ हजार २५९ लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत
शेतीपूरक औजारे खरेदी केली आहेत. त्यामुळे कृषी विभागाने उर्वरित औजारे खरेदी करण्यासाठी प्रतीक्षेतील लाभार्थ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरित एक हजार प्रतीक्षेतील लाभार्थ्यांना कृषिपूरक तेरा औजारे खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
….
….
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने २० ऑगस्ट २०२५ रोजी लॉटरी पद्धतीने कृषीपूरक विविध तेरा औजारांची लॉटरी काढली होती. ती साहित्य खरेदी करण्यासाठी तीनवेळा मुदतवाढ दिली. मात्र, त्यानंतरही फक्त ५० टक्केच शेतकऱ्यांनी साहित्य खरेदी केले आहेत. त्यामुळे उर्वरित साहित्य खरेदीसाठी प्रतीक्षेतील लाभार्थ्यांना खरेदीची संधी देण्याचा निर्णय घेतले आहे. तशा सूचना प्रत्येक तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे जवळपास एक हजार प्रतीक्षेतील लाभार्थ्यांना विविध कृषी पूरक साहित्य खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
हरीदास हावळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर
















