सोलापूर – शेअर मार्केटमध्ये झालेले कर्ज फेडण्यासाठी माहेरकडून १ लाख रुपये घेवून ये म्हणत विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केला.याप्रकरणी पती, सासू सासऱ्यावर सदर बझार पोलिसांत मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना विवाहितेच्या सासरी २८ ऑक्टोबर २०२० ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान केशन नगर,पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी घडली. याबाबत पल्लवी मल्लेश दिवेकर (वय ३० रा. उत्तर सदर बझार, कुंभार गल्ली, मौलाली चौक, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती मल्लेश महादेव दिवेकर ,सासरे महादेव, सासू सुमित्रा (रा.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहिता सासरी नांदत होती. त्यावेळी आरोपींनी विवाहितेस तुझ्या माहेरच्या लग्नात मानपान केला नाही.
तसेच लग्न झाल्यापासून मुल न झाले नाही म्हणत आरोपींनी विवाहितेच्या पतीचे दुसरे लग्न करून देण्याची धमकी दिली. तसेच पती मल्लेश यास शेअर मार्केटमध्ये झालेले कर्ज फेडण्यासाठी तुझ्या आई वडिलांकडून १ लाख रुपये घेवू ये असे म्हणून शिवीगाळ,व मानसिक त्रास दिला आहे. असे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार इनामदार हे करीत आहेत.

























