अक्कलकोट – आंबेडकर चळवळीतील नेते पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपाचे माजी जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रकांत इंगळे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात प्रवेश करून जेऊर जिल्हा परिषद मतदार संघात अचानक निवडणुकांची रणसिंग फुंकल्याने अक्कलकोट तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे.
देशाचे नेते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष विक्रांत नाना देशमुख व कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुकाध्यक्ष बंदे नवाज कोरबू यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून आंबेडकर चळवळीतील नेते व गोरगरीब लोकांचे कैवारी पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत इंगळे यांनी भाजपा कडून जेऊर जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवारी मिळत नसल्याचा अंदाज आल्याने आज बुधवार रोजी खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात प्रवेश करून जेऊर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणसिंग फुकले आहे.
मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीत जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत होतो.आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता असल्याने मी स्वाभिमानी आहे. माझ्या स्वार्थासाठी अथवा पैशासाठी इकडून तीकडे खोट नाट बोलण्याची मला सवय नाही.यामुळे मला भाजपा मध्ये नेहमी दुय्यम स्थान मिळत आहे.फोन केले तर फोन घेणे टाळत आहे. कार्यालयात व घरी भेटायला गेल्यावर भेट घेण्याचे टाळत आहेत. जनतेचा काम घेऊन गेल्यावर विचारत नाही बोलत नाहीत अशा ठिकाणी राहून जनतेचा विकास कसा साध्याच म्हणून मी आज देशाचे नेते शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे.
– चंद्रकांत इंगळे माजी सभापती अक्कलकोट, भाजपाचे माजी जिल्हा कोषाध्यक्ष

















