सोलापूर – डी.बा.टू (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ), लोणेरे, आयोजित इंटर झोनल पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर येथील विद्यार्थिनी साक्षी सूरा हिने 47 किलोग्रॅम वजन गटात सुवर्णपदक जिंकून महाविद्यालयाचा अभिमान वाढविला आहे. हि स्पर्धा ओर्चीड इंजिनीरिंग कॉलेज मध्ये भरविण्यात आली होती या स्पर्धेत विविध झोनमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
उत्कृष्ट तयारी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर साक्षीने सर्व प्रतिस्पर्थ्यांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल जिमखाना चेअरमन प्रा. अमित वडवेराव, प्राचार्य डॉ. अनिल देशमाने, अध्यक्ष इं. रवींद्र गायकवाड यांच्या कडून मार्ग दर्शन लाभले, तसेच सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांनी साक्षीचे मनःपूर्वक अभिनंदन केले, तिने पुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावरही महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळी प्रोफेसरअझरुद्दीन पेरमपल्ली प्रोफेसर अमित वडवे राव विजेता साक्षी सुरा महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड प्राचार्य अनिल देशमाने डॉ. संजीव भोसले श्रीनिवास जोग

















