अक्कलकोट – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्रीमंत मृदूलाराजे भोसले मुरलीधर मंदीर नियोजीत भक्त निवासाचे बांधकाम देवस्थानच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. सदरहू बांधकामाचे कार्य श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रयत्नातून जोमाने सुरू आहे. या बांधकामाची पाहणी करून सद्या नियोजीत मुरलीधर मंदीर भक्त निवासाचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
या प्रसंगी बोलताना चेअरमन महेश इंगळे यांनी सदरहू बांधकामाचे आत्तापर्यंत फाईल फाउंडेशन, पाईल कॅप, कॉलम आणि पहिला मजला स्लॅब पर्यत आपले काम योग्यरीत्या पूर्ण झाले आहे. पहिला स्लॅब ५२३० स्क्वेअर फुटचा स्लॅबचा काँक्रीट कास्टिंग करण्यासाठी आर.एम.सी.म्हणजेच रेडी मिक्स काँक्रेट एम.२५ ग्रेड अल्ट्राटेकचे मटेरियल वापरले आहे.
उर्वरीत बांधकाम स्वामी भक्तांच्या सहकार्यांतून लवकरच पुर्ण होवून स्वामी भक्तांच्या सेवेत ही वास्तु (नियोजीत भक्त निवास) उपलब्ध होणार आहे. ज्या स्वामी भक्तांना या बांधकाम सेवेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी ९८६०१८९३५१ / ०२१८१-२२०३२१ / ९६३७९०४८४६ या क्रमांकावर संपर्क साधून श्री स्वामी समर्थांच्या या बांधकाम सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
नियोजीत मुरलीधर मंदीर भक्त निवास बांधकामाची पाहणी करताना चेअरमन महेश इंगळे, व अन्य दिसत आहेत.






















