करमाळा – श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
मंदीर जतन संवर्धन कामास आज मंगळवार दिनांक ११.११.२०२५. रोजी कालिंदी औदुंबर जाधव.रा . करमाळा यांच्या कडून धनादेश चेक ने देणगी ५१,०००/- (रु.एकावन्न हजार फक्त ) प्राप्त झाली आहे.🙏 यावेळी निवृत्त पोलीस उपायुक्त अभय शंकरराव येवले. छाया अरुण सूर्यवंशी उपस्थित होते .
या निमित्त श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीकडून सौ.कल्पना दादासाहेब पुजारी, रामदास सोरटे, भारत सोरटे, व्यवस्थापक अशोक गाठे यांनी सत्कार केला आहे.
श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्या कारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे .
तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधा उपलब्ध आहे .


















