मोडनिंब – माढा तालुक्यातील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या तीर्थक्षेत्र अरण येथे गत वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र अरण विकासाची घोषणा केली, सदर विकासकामांचा विकास आराखडा तयार करून या कामासाठी कॅबिनेट मध्ये १५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तीर्थक्षेत्र अरण विकासाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली.
याकरिता त्यांचे संत सावता महाराज यांचे वंशज सावता महाराज वसेकर ,प्रभु महाराज माळी, साखरचंद महाराज लोखंडे ,व्याख्याते अमर हजारे यांनी वारकरी भाविक भक्त परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी तीर्थक्षेत्र अरण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच ,तसेच निवडणुका संपल्यानंतर येथील विकासकामांचे उद्घाटन करणार असून, तिथे होत असलेल्या कामावर आणि येणाऱ्या अडचणीवर लक्ष आहे.
तसेच येणाऱ्या काळात उत्तम व्यवस्था आणि वारकरी सेवेसाठी सरकार कटिबद्ध राहून अरण विकासाला गती देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले असल्याचे प्रभू महाराज माळी यांनी सांगितले.


















