सांगोला – सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेज यांच्या तर्फे सांगोला बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी बाक भेट देण्यात आले.
प्राचार्य अमोल गायकवाड यांच्या हस्ते सांगोला आगारचे सहा.वाहतूक अधिक्षक पंकज तोंडे, वाहतूक नियंत्रक प्रशांत चंदनशिवे यांना सदर बाक देण्यात आले.
यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेज येथील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.






















