Thursday, February 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विष्णूपद मंदिर येथे मंदिर समिती मार्फत पुरेसा सोई सुविधा

तरुण भारतbyतरुण भारत
November 20, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – मार्गशिर्ष शुध्द ०१ ते मार्गशिर्ष वद्य ३० या कालावधीत श्री विठ्ठलाचे वास्तव्य विष्णूपदावर असते, अशी धारणा आहे. त्यामुळे महिनाभर विष्णूपद येथे दर्शनास भाविकांची गर्दी असते. यावर्षी दिनांक २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२५ दरम्यान विष्णूपद उत्सव संपन्न होत असून, या उत्सवास दिनांक २० नोव्हेंबर पासून सुरवात होत असून, गोपाळपूर रोडवरील विष्णूपद मंदिर येथे मंदिर समिती मार्फत भाविकांना पुरेसा सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

मंदिर समितीने पंढरपूर शहर व परिसरातील २८ परिवार देवता सन २०१५ मध्ये ताब्यात घेतल्या असून, त्याचे व्यवस्थापन मंदिर समिती मार्फत चालविण्यात येते. त्यामध्ये गोपाळूपर रोडवरील चंद्रभागा नदीपात्रातील विष्णूपद मंदिराचा समावेश असून, या ठिकाणी दर्शनरांगेसाठी बॅरीकेटींग, सुरक्षा व्यवस्थेकामी कमांडोज, पिण्याच्या पाण्याची सोय, चांगली स्वच्छता व्यवस्था, अभिषेक पुजा भाविकांना उपलब्ध करून देणे, विद्युत रोषणाई व इतर अनुषंगीक व्यवस्था करण्यात येत असून, सदर ठिकाणी वन भोजनाची प्रथा असल्याने स्वच्छतेसाठी जादा कर्मचा-याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पंढरपूर नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांना देखील पत्रव्यवहार करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणेबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सदर ठिकाणी नियोजनाच्या अनुषंगाने आज दि. १९ नोव्हेंबर रोजी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांनी स्थळ पाहणी केली. यावेळी बांधकाम विभाग प्रमुख बलभिम पावले, सुरक्षा विभाग प्रमुख राजाराम ढगे, विद्युत विभाग प्रमुख शंकर मदने तसेच परिवार देवता विभाग प्रमुख अतुल बक्षी उपस्थित होते.

विष्णूपद मंदिर येथे एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहुडाचरण पावलं उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची आणि काल्याच्या वाडग्याची खूण दिसते. या शिळेवर दगडी मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपाच्या खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहुडाचरण मुरलीधराची मू्र्ती कोरण्यात आली असून, विठ्ठलाने आपल्या सवंगड्यासह व गाईंसह क्रीडा केल्या व भोजन केलं. तेव्हा इथं देवाची आणि गाईची पावलं उमटली. विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्यानं इथं उमटलेल्या पावलांमुळे या ठिकाणाला विष्णुपद असं नाव मिळालं. मार्गशीर्ष महिन्यात विठुराया या ठिकाणी निवासाला येतो, असं मानलं जातं. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. याशिवाय, भाविक नौकानयनाचा आनंद घेतात व दर्शन घेऊन वनभोजनाचा आनंद लुटतात. येथे येणाऱ्या सर्व भाविकांना मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देऊन तेथील सर्व प्रथा व परंपरेचे पालन करण्याची दक्षता मंदिर समितीने घेतल्याचे प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी यावेळी सांगीतले.

Post Views: 49
Previous Post

श्री धानेश्वरी देवी चेट्टी आमवशा यात्रा महोत्सव निमित्त धार्मिक कार्यक्रम

Next Post

बालगृहातील मुलांना शिक्षणासह सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बालगृहातील मुलांना शिक्षणासह सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

ताज्या बातम्या

पानगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी.#शिवजयंती

February 19, 2026

पारध येथे जनता विद्यालयात शिवजयंती व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.#public #marathinews #viral

February 19, 2026

वाशी तालुक्यात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली#public

February 19, 2026

स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन थाटात संपन्न

February 19, 2026

सरस्वती विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.#public #marathinews #viral

February 19, 2026

छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावर अजिंठा घाटात दोन ट्रकचा अपघात..#public #solapurnews

February 19, 2026

प्रख्यात भागवत कथाकार निरंजन भाईजी महाराज आळंदी देवाची यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.#viral

February 19, 2026

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर 425 विद्यार्थी देणार परीक्षा#public

February 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0687338

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697